महापुरुषांनी मानवता हीच गुणवत्ता मानली -प्रा.डॉ. रामकृष्ण बदने

 

नायगाव -आज मौजे कार्ला ता.नायगांव जि.नांदेड येथे विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार संपन्न होत आहे. आज समाजात गुणवंतांपेक्षा धनवंतांना महत्त्व दिले जात आहे. अशा काळात मानवतावादी विचार मंचाकडून गुणवंतांचा सत्कार संपन्न केला जातो आहे ही स्तुत्य बाब आहे. मानवतावादी विचार मंचाकडून चारित्र्य,व्यसनमुक्त समाज आणि जीवन जगण्याचे ज्ञान या त्रिसूत्रीवर समाज निर्माण व्हावा असा ध्यास घेऊन ही ज्येष्ठ मंडळी कार्य करत आहेत. आजच्या काळात शिक्षणाशिवाय आपला उद्धार कोणीच करू शकणार नाही म्हणून आपण शिक्षणाला अत्याधिक महत्त्व दिले पाहिजे. तसेच व्यसनामुळे समाजामध्ये विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.तेंव्हा आपण व्यसनापासून दूर राहिले पाहिजे.आपल्या मनावर संस्कार करण्याचे काम आई करते. मला देखील घडविण्यात माझ्या आईचा सिंहाचा वाटा होता. जगातल्या अनेक लोकांना घडवण्यात त्यांच्या आईचा सिंहाचा वाटा राहिला आहे. म्हणून आपण आई-वडिलांना जपलं पाहिजे.आता गुणवत्तेचा संबंध आपण मार्कांसी जोडतो आहोत पण पूर्वी महापुरुषांनी मानवता हीच गुणवत्ता मानली होती असे प्रतिपादन ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालयात वसंतनगर ता.मुखेड येथील प्रसिद्ध वक्ते प्रा. डॉ.रामकृष्ण बदने यांनी मौजे कार्ला ता.नायगाव जी. नांदेड येथील मानवतावादी विचार मंचाच्या वतीने आयोजित विशेष व्याख्यान,गुणवंत सत्कार समारंभ व मानवतावादी विचार मंच पदग्रहण समारंभ प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.

अध्यक्षीय समारोप करताना परम श्रद्धेय डाॅ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज म्हणाले की कार्ला गावातील लोकांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.मानवतावादी विचार मंचाद्वारा ही जेष्ठ मंडळी समाजात शिक्षणाचे व चारित्र्याचे महत्त्व समजावून देत आहेत.आपण आईवर नेहमी ऐकतो पण थोडक्यात आसते पण रामकृष्ण बदने सर हे या विषयावर विस्ताराने बोलतात.मागच्या अध्यक्षांनी चांगले काम केले.नूतन अध्यक्षांनी विविध उपक्रम घ्यावेत.या कामाला त्यांनी यावेळी आशीर्वाद दिला.
यावेळी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी विठ्ठल वडजे,बालाजी लिंगनवाड यांचीही समायोचित भाषने झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानवता विचार मंचाचे मावळते अध्यक्ष विश्वंभर व्हनशेटे यांनी करून कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका विशद केली.तर सूत्रसंचलन बालाजी व्हनशेटे व आभार नूतन अध्यक्ष मारुती मामीलवाड यांनी मानले.
कार्यक्रमात प्रकाश कांबळे, डॉ.श्रद्धा व्हनशेटे, डॉ.ऋतुजा व्हनशेटे, डॉ.कपील व्हनशेटे व अन्य अनेक गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

सदरील कार्यक्रमास गावचे पोलीस पाटील प्रेमकुमार व्हनशेटे, उपसरपंच सिद्राम व्हनशेटे,निवृत्त शिक्षक शेषराव गुरुजी, जेष्ठ नागरिक बापूराव शंकरराव व्हनशेटे, उत्तमराव व्हनशेटे,बालाजी नागोराव वडजे, मानवता विचार मंचाचे पांपटवार सावकार,विलास चव्हाण, संग्राम मस्कले, शिवाजी पाटील कार्लेकर,प्रा.पावडे सर,पा.डा. पवार व ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *