लोहा; प्रतिनिधी;
लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे विकासाभिमुख लोकप्रिय आमदार तथा नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून काल दि.2 मार्च रविवार रोजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नांदेड येथील साई सुभाष निवासस्थानी राष्ट्रवादी अजित दादा पवार गटात जाहीर प्रवेश केला, यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अशोक सोनकांबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शाल श्रीफळ पुष्पहार घालून स्वागत करून पक्ष प्रवेश केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अशोक सोनकांबळे यांनी माजी आमदार शामसुंदर शिंदे यांचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून पाच वर्ष काम केलेले असून अशोक सोनकांबळे पत्रकार आहेत,दरम्यानच्या काळात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल, ते मतदारसंघात सर्व परिचित असून, त्यांची प्रामाणिक, शांत, सयंमी,मितभाषी व्यक्तीमत्व म्हणून मिडिया परिवारात ओळख आहे.त्यांनी लोहा तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुका सदस्य व सिद्धार्थ नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय उपक्रमांत समजापयोगी भावनेने योगदान दिले आहे.
सिद्धार्थ नगर येथे,सर्व जाती धर्माच्या सण उत्सवात हिरहिरीने सहभागी होऊन,महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी,दुर्गा देवी,गणपती उत्सव, मोहरम,रमजान आदी उत्सवात सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यात यशस्वीपणे भुमिका पार पाडली आहे. अशोक सोनकांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटात प्रवेश केल्याने आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी अशोक सोनकांबळे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी आंबेडकरी चळवळीचे युवा नेते रविदादा गायकवाड, लोहा नगर परिषदेचे मा. नगरसेवक भास्कर पाटील पवार,शिक्षण जिल्हा पतपेढीचे चेअरमन अशोक पाटील मारतळेकर, उपाध्यक्ष सुहास मुळे,सचिन पवार,सह मित्रपरिवार उपस्थित होता.त्यांच्या निवडीबद्दल आप्तवासिय ,मित्रपरिवार, हितचिंतकांनी सोशलमिडियांच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला असून,भावी कार्यासाठी शुभेच्छा देतांना दिसून येत आहेत .