(मुखेड: विशेष प्रतिनिधी दादाराव आगलावे )
तालुुक्यातील होकर्णा येथे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी राजेश जाधव यांचे शेतकऱ्यांना अग्रीस्टॅक फार्मर आयडी बद्दल मार्गदर्शन नुकतेच संपन्न झाले.
यावेळी होकर्णा सज्जाचे तलाठी पोलीस पाटील सौ.जयश्री गणपतराव माने, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर पा. लुट्टे, से.सो.चे. बालाजी नागोराव पा. गवते, सरपंच व्यंकटराव पा. गवते, गणपतराव पा. माने, अंगणवाडी कार्यकर्ती अहिल्याबाई गवते, महसुल सेविका लक्ष्मीबाई विश्वनाथ पा.मुंगडे, संदीप राजेंद्र गवते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तहसीलदार राजेश जाधव यांनी अग्री स्टॅक फार्मर आयडी बद्दल अगदी सविस्तर अशी माहिती दिली. यावेळी गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.