(मुखेड विशेष प्रतिनिधी: दादाराव आगलावे )
महाराष्ट्र राज्य न.प. कर्मचारी /संवर्ग कर्मचारी संघटना शाखा मुखेड च्या वतीने नगरपालिका वाचनालयात नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे होते तर उद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून न.प. कर्मचारी /संवर्ग कर्मचारी संघटना मराठवाडा अध्यक्ष बलभीम शेंडगे, डॉ. रचिता कौरवार, एडवोकेटसौ. शारदा पाटील जाधव, पत्रकार संघाचे अध्यक्ष मेहताब शेख, पत्रकार दादाराव आगलावे, राजू रोडगे, गोविंद पाटील जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. दिलीप पुंडे पुढे म्हणाले की राज्य शासन रोजगार निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते. युवा महिला वर्गाचे शिक्षण पूर्ण झाल्यांनतर वेळेत योग्य मार्गदर्शन आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी भांडवलाची उपलब्ध शासन विविध योजनांच्या माध्यमातून करून देत आहे. रोजगार इच्छुक युवक-युवती आणि रोजगार देणाऱ्या विविध आस्थापना यांच्यामध्ये संवाद आणि समन्वय साधून उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ आणि युवा वर्गाला रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू केली आहे.
रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी युवा-युवतींनी जागरूक असले पाहिजे यामुळे आपल्या श्रमाला नक्कीच प्रतिष्ठा मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच माया वाघमारे ही सफाई कामगार असलेली युवती ती आज ‘कर निर्धारक अधिकारी’ म्हणून नियुक्ती झाली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, डॉ. रचिता कौरवार, एडवोकेट शारदा पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक न.पा. मराठवाडा अध्यक्ष बलभीम शेंडगे यांनी केले.प्रारंभी राष्ट्रगीत गाऊन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर अनेक महिलांचा यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम गुरुजी बनसोडे यांनी केले तर आभार तेजेराव गायकवाड यांनी मानले.