*सोलापूरच्या नाट्य, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे शिक्षक महासंघाचे राज्य संघटनमंत्री, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख कृष्णा हिरेमठ सर यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोषाध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड 2025 ते 2030 या कालावधी करिता करण्यात आली.
सोलापूर मध्ये संपन्न झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलनात त्यांनी कार्यवाह म्हणून उल्लेखनीय कार्य करून बालनाट्य संमेलन यशस्वी केले होते. तसेच गतवर्षी सोलापूर मध्ये शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन संपन्न झाले. या संमेलनात त्यांनी समन्वयक म्हणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
या दोन्ही संमेलनामध्ये शिक्षण विभागाचा आणि शिक्षकांचा सहभाग कौतुकास्पद होता. शिक्षक महासंघाचे अनेक पदाधिकारी, सभासदांना संमेलनात विविध समित्यावर कार्य करण्याची संधी मिळाली. कृष्णा हिरेमठ सर यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे*.