अहमदपूर: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि
डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने नवोदित कवींसाठी एक दिवसीय कविता – लेखन कार्यशाळा शुक्रवार दि 07 मार्च 25 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे पार पडली. कार्यशाळेच्या शेवटी सहभागी कवींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. प्रा भगवान आमलापुरे यांना प्रमाणपत्र वितरण करताना ख्यातनाम वक्ते प्रा डॉ विश्वाधार देशमुख आणि समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. बालाजी भंडारे छायाचित्रात दिसत आहेत. छायाचित्र : रामेश्वर सोरगेकर, हडोळती.