(कंधार ; दिगांबर वाघमारे )
आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कट्टर समर्थक तथा कार्यकर्त्या सौ . अनुसयाताई चेतन केंद्रे यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला कॉग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असून राष्ट्रवादी महिला कॉग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा श्रीमती रुपाली निलेश चाकणकर यांनी सदर निवड करून कौतूकाची थाप दिली आहे .
सौ अनुसयाताई चेतन केंद्रे ह्या कंधार नगरपालीकेच्या माजी नगराध्यक्षा असून सामाजिक कार्यकर्त्या आहेत.त्यांच्या कार्यांची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला कॉग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार,प्रदेशाध्यक्ष मा. खा.श्री.सुनीलजी तटकरे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.खा.श्री.प्रफुल्लभाई पटेल,प्रदेशाध्यक्षा श्रीमती रुपाली निलेश चाकणकर यांचे मनापासून आभार मानले असून त्यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील तसेच पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी तत्पर राहील अशी प्रतिक्रिया यावेळी निवडीबद्दल सौ.अनुसयाताई चेतन केंद्रे यांनी दिल्या .
या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर, कंधार पं स चे माजी उपसभापती संभाजीराव पाटील केंद्रे . कंधार तालुकाध्यक्ष किशनराव डफडे , महात्मा फुले उच्च मा.विद्यालयाचे प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे,मधू पाटील डांगे,कृषी उत्पन्न बाजार समिती कंधारचे माजी सभापती बाबूराव केंद्रे,संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डी.एन केंद्रे,माजी कृषी अधिकारी परळी तुकाराम गिते,नांदेड आरएफओ माधव केंद्रे,माजी कृषी अधिकारी नारायण गुट्टे,वरपडे सर,बालाजी गंगाराम डफडे,कैलास नवघरे ,नगरसेवक प्रतिनिधी आसेफ शेख ,व्यंकट नागलवाड ,मा.नगरसेविका अनिता कदम , सुशिला दत्ता केंद्रे,जिजा लुंगारे , आदीनी त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.