पांचाळपूर नगरी इतिहासाची नोंद असलेली ही ऐतिहासिक नगरी आहे.या शहरात दि.११ मार्च १९८१ रोजी जन्मलेला हा सद्गुणी युवक निलेश होय.जगतुंग समुद्र आणि मन्याड खोऱ्यातील मनकर्णिकेच्या तीरावर वसलेल्या हतईपुरा येथे एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेला हा नव तरुण युवक ज्यांनी आपली ख्याती संबंध मराठवाड्यावर या सामाजिक,धार्मिक आणि शैक्षणिक अशा विविध कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवून आपले नाव सर्वांना परिचित करून दिले आहे.असा तो सर्वगुण संपन्न नेतृत्वाचा युवक म्हणजेच ‘निलेश गायकवाड ‘ होय.
आपल्या आई-वडिलांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन गोर- गरीब कुटुंबात जीवन जगताना अनेक वेळा कठीण परिस्थितीत जगावे लागले.कठीण प्रसंगातून सावरताना ते आज मात्र आसमंत गगनभरारी घेणारे जसे एखाद्या ‘फिनिक्स’ पक्षाप्रमाणे पुढे आले आहे.वयाच्या अवघ्या लहानपणी म्हणजेच आजघडीला ३१ वर्षांपूर्वीच वडिलांचे छत्र हरवले तेव्हापासून कुटुंबातील लहान भाऊ,बहीण आणि आई यांना जीवन जगण्याची दिशा देण्याचा मानस संकल्प या निलेशने केला होता.वडिलांच्या हयातीत हायस्कूलचे शिक्षण गणपतराव मोरे विद्यालय कंधार येथे इयत्ता ९ वी पर्यंत झाले.तर निलेश चे बाबा” अशोक आनंदराव गायकवाड यांच्या हयातीनंतर कुंडलवाडी येथील वडीलांचे मामा का.बापूराव मकाजी कांबळे यांच्याकडे राहून मिलिंद विद्यालयातून त्यांनी एसएससी उत्तीर्ण केली.तर श्री शिवाजी कॉलेज नवरंगपुरा कंधार येथून बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.ही बाब वाखाणण्याजोगी आहे.
ग्रामीण भागात रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने बहादरपुरा येथे पांचाळपूर सहकारी जिनिंग प्रेसिंगची स्थापना केली होती.आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने निलेशनी या जिनिंग मध्ये काम करण्यास सुरुवात केली.इथे काम करत असताना त्यांच्या कामाची व प्रमाणितपणाची दखल येथील संचालक मंडळांनी घेतली.तत्कालीन संचालक कै.केरबा पाटील पेठकर आणि आनंदा उर्फ खंडू पाटील मोरे यांनी या निलेशला घेऊन भाई केशवराव धोंडगे आणि भाई गुरुनाथराव कुरूडे यांच्याकडे वेळोवेळी शिफारशी केल्या होत्या.या पोराचा प्रमाणिकपणा व मेहनत पाहून भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी सन २००३ मध्ये श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या वजीराबाद नांदेड येथील श्री शिवाजी प्राथमिक शाळेमध्ये “शिपाई “या पदावर नेमणूक केली.निलेशनीं याचं शिक्षण संस्थेमध्ये कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले स्मुर्तीशेष प्रा.सदानंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी ‘श्रामनेर’ शिबिराच्या माध्यमांतून त्यांना ‘श्रामनेर’ होण्याचा मुलमंत्र निलेश गायकवाड यांना देण्यात आला.तदनंतर निलेशनी आपल्या बौद्ध धम्मिक संस्कार आणि धम्मिक उपदेशनाचे धडे रुजवतं असतांना महाबोधी बुद्ध विहार भीम नगर येथे ५ वर्ष धम्मिक संस्कार विधी हे लहान,थोर मंडळींच्या जीवनांमध्ये बौद्ध विचारांची उपासना केली.बौद्ध धम्माचे अष्टांग मार्ग,धम्म संस्कार विधी आदी मुखोगत केले.या धम्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये कंधार शहरासह तालुक्यातील बौद्ध समाजांसाठी उपयोगी पडतात.एवढे शक्य हे प्रा.सदानंद कांबळे व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड आणि कंधार यांच्या प्रेरणेने त्यांना लाभली आहे.शहर,तालुका आणि जिल्ह्याबाहेरील मंगल परिणय,साक्षगंध सोहळा आणि अंत्यविधी आदींसाठी निलेश गायकवाड यांची उपस्थिती ही ऊन,वारा,पाऊस आणि थंडीतही वेळेला न जुमानता त्यांनी या कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवून प्रत्येकाच्या जीवनातील एक सदस्य होऊन हे आपले धम्मिक कार्य,सामाजिक कार्याच्या माध्यमातून पार पाडतात,हे उल्लेखनीय बाबं आहे.भाई गुरुनाथराव कुरुडे आणि त्यांचे बंधू प्रा.वैजनाथराव कुरुडे आदींच्या सोबत सामाजिक जीवनात वावरत असताना देश-विदेशात अनेक ठिकाणी प्रेक्षणीय स्थळे,प्राचीन किल्ले,दुर्मिळ प्राणी संग्रहालय,विविध धार्मिक मंदिरे आदिंसह बौद्ध स्तूप,दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस येथे भेटी देऊन पर्यटन विकासाची माहिती घेतली.जागतिक वारसा लाभलेल्या आशिया खंडातील श्रीलंका,थायलंड, नेपाळ या विविध ठिकाणातील बौद्ध विहाराला भेटी देऊन थायलंड येथील गोल्डन टेंम्पल मध्ये बौद्ध भिकू संघाचा परिचय करून घेतला.याशिवाय त्याठिकाणी निलेशनीं बुद्ध वंदना ही घेतली.
निलेश गायकवाड हे विविध क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे त्यांना भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी स.न.२००३ -२००४ या काळात नांदेड जिल्ह्यात साप्ताहिक “बहुजन प्रताप ” या वृत्तपत्रात काम करण्याची संधी दिली.त्यांनी विविध बातम्या या साप्ताहिकातून प्रकाशित केल्या.याचवेळी भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी अरविद कळस्कर यांच्यासोबत राहून नांदेड जिल्ह्यातील विविध बातम्या आणि जाहिरात संकलन करण्याची जबाबदारी दिली.त्यानंतर स्वतःचे यूट्यूब चैनल ‘समता मराठी नेटवर्क’ हे मराठी भाषेतून सुरू करून मराठी माणसासोबतच बहुभाषिक युट्यूब यूजर ना भुरळ घातली.आतापर्यंत त्यांनी सबस्क्राईब वर ७२७० तर युजर्स ज्यांनी या युट्युब ची दखल घेतली.असे २२ लाख ६८ हजार ५२ लोकांनी या व्हिडिओंचा लाभ घेतला.हे यूट्यूब चैनल अविरतपणे चालू असून नांदेड येथील ठाकूर शंकरसिंह साहेब यांनी कंधार येथे दैनिक वीर शीरोमणी या दैनिकासाठी प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी निलेश वर सोपवली.आणि त्यांनी गेली एक वर्ष अविरतपणे आपल्या बातम्या,जाहिराती या दैनिकासाठी काम करत आहे.
भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती सुलोचना गुरुनाथराव कुरुडे यांना सन २००३ मध्ये डेंगू सारखा आजार झाल्यामुळे या माऊलीची हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत हरवली.आणि खऱ्या अर्थाने तेथूनच निलेशच्या सेवेचा कार्यकाळ सुरू झाला.सन २००३ पासून भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या सोबतच राहुन नेहमी भाईना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करण्याची जबाबदारी निलेश वर आली.कोरोना काळात भाई सोबत नांदेड येथे राहून त्यांची काळजी घेतली.मी माझं भाग्य मानतो.मी भाईंची सेवा करण्यात कुठेही कमी पडलो नाही.आई-वडिलांनंतर जर कोणी माझ्या आयुष्यात मोठे असतील तर ते म्हणजे माझ्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्य सेनानी तथा मा.खा.व आ.डॉ.भाई केशवराव धोंडगे आणि मा.आमदार तथा थोर स्वातंत्र्य सेनानी भाई गुरुनाथराव कुरुडे हेच खरे माझे पालक आहेत.अशा या निलेश गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या निरागस त्यांच्या आवडीच्या बालकास अशा ‘विपुल’ शुभेच्छा देत आहोत.असेच अनेक धार्मिक,सामाजिक आणि शैक्षणिक कार्य ‘निलेश गायकवाड’ यांनी आपले जीवन जगतांना उपेक्षित,वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या शैक्षणिक जीवनांत “सोनेरी चाफा” फुलवावा ही संकल्पना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
मानाची कोटी-कोटी जयक्रांती.संभाजी कांबळे
कंधार
मो.नं.९७६५७३४२४५

