बंजारा समाजाच्या वतीने पारंपारिक होळी उत्सव मोठ्या थाटात  साजरा….संत मिठु भिकिया महाराज गडासह अनेक तांड्यावर लुटला धुलीवंदनाचा आनंद

( कंधार ; दिगांबर वाघमारे )

तालुक्यामध्ये बंजारा समाजाच्या तांड्याची संख्या मोठ्या प्रमाणात असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कंधार तालुक्यातील बहुतांशी तांडा वर पारंपारिक होळी उत्सव दि१४ मार्च रोजी मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.

होळी सणाची वाट बंजारा समाज आतुरतेने बघत असतो बंजारा समाजाची होळी पंधरा दिवसापासून सुरू झालेली असते बंजारा समाजातील नायक कारभारी डायसाने यांच्या उपस्थितीमध्ये पारंपारिक गीत लेंगी, या गीताच्या तालावर नृत्य करत संत सेवालाल महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर हा समाज चालत असतो वर्षातून एकदा येणारा होळी सण सर्व तांड्यावर थाटात साजरा केला जातो .
होळीच्या दिवशी होळी पेटून महिला पुरुष तरुण वर्ग होळीच्या सभोवताली संत सेवालाल महाराज विविध देवतेची आराधना करत गीत गायले जातात दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाच्या दिवशी धुंड साजरा केला जातो कंधार तालुक्यातील ढाकू तांडा खेमा तांडा, भोजू तांडा, पांगरा तांडा,काशीराम तांडा, हिरामण तांडा,गणा तांडा यासह अनेक तांड्यावर पारंपारिक पद्धतीने होळी सण साजरा आले .

तालुक्यातील पानशेवडी येथील  संत मिठु भुकीया महाराज गडावर या वर्षी मोठ्या थाटात होळी साजरी केली, या होळी उत्सवाचे आयोजन भाजपा उपजिल्हा अध्यक्ष भगवान राठोड यांनी केले होते . या वेळी अनेक तांडयाचें  नायक कारभारी, श्रीराम जाधव, सुधाकर राठोड, रमेश जाधव ,संतोष राठोड, अंकुश पवार, परमेश्वर पवार ,प्रल्हाद पवार ,जेष्ठ नायक किशन, नायक राठोड यांच्यासह रामा तांडा, खेमा तांडा ,भोजू तांडा ,गणपुर तांडा, किसन तांडा परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने संत मिठु भिकिया महाराज गडावर  उपस्थित होते तालुक्यात सर्वत्र होळी थाटात साजरी झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *