(कंधार/ दिगांबर वाघमारे )
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या हताईपुरा येथील मगदुमिया उर्दू प्रा. शाळेचे मुख्याध्यापक मंजुर अहमद अब्दुल रज्जाक परदेसी हे नियत वयोमानानुसार दि. २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले. सोसायटीचे सचिव माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करून त्यांना कार्यमुक्तीचा आदेश देण्यात आला. परदेसी सरांची एकूण सेवा ३४ वर्ष ७ महिने एवढी झाली आहे.
दि. १/८/१९९० रोजी परदेसी गुरुजींची मगदुमिया प्रा. शाळेत सर्वप्रथम सह शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. अध्यापन बरोबरच त्यांना ॲडमिनिस्ट्रेशनाबाबत माहिती असल्याने संस्थेने त्यांच्यावर मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सोपवली. १९९५ पासून सेवानिवृत्ती पर्यंत म्हणजेच २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत त्यांनी मुख्याध्यापकाची जबाबदारी अत्यंत चोखपणे बजावली. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी कार्यालयात त्यांच्या शब्दाला मान होता. यामुळे शाळेची कोणतीही कामे प्राधान्य क्रमाने होत असे.
२८ फेब्रुवारी २०२५ रोजी संस्थेचे सचिव माजी आमदार गुरुनाथराव कुरूडे यांच्या कार्यालयात सेवानिवृत्ती बद्दल त्यांचा शाल व पुष्पहार देऊन छोटेखानी सत्कार करण्यात आला.
यावेळी गुरुनाथराव कुरूडे यांच्यासह गंगामाता प्रा. शाळेचे मुख्याध्यापक हाजी महोम्मद अन्सारोदीन, अड. हफीज घडीवाला, बबुखा पठाण, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक लईखोद्दीन सरवरी, म. मगदूम परदेसी, हसीब परदेसी, निमरान परदेसी, निलेश गायकवाड आदी उपस्थित होते.