(कंधार ; प्रतिनिधी )
कंधार म्हटल्यावर डोळ्यांसमोर उभे राहते ते डोंगरदऱ्यात असलेला कंधार तालूका.मौजे फुलवळ,ता.कंधार येथील संदीप देवकांबळे यांची आपल्या आर्थिक हालाखीच्या परिस्थितीवर मात करुन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन महसुल साहाय्यकपदी निवड झाली आहे,
फुलवळ नगरीतील शासकीय गुत्तेदार माधवराव पटणे,नामदेवराव पटणे वैजनाथ सादलापुरे,ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच विमलबाई मंगनाळे,सदस्य चंदबस मंगनाळे,पत्रकार मधुकर डांगे, धोंडीबा बोरगावे,सरपंच प्रतिनिधी नागनाथ मंगनाळे,यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले,
संदीपने चार वेळा परीक्षेस सामोरे जावून प्रयत्न केला पण पाचव्यांदा यश आले. फुलवळचा पहीलाच एमपीएसीचा मानकरी ठरला आहे. फुलवळ या गावांतील संदीप मुकुंद देवकांबळे यांचे शिक्षण जि.प. प्राथमिक फुलवळ येथे झाले, माध्यमिक शिक्षण जगदंबा हायस्कुल माहुर येथे झाले आणि पदवीचे शिक्षण धर्माबादच्या महाविद्यालय झाले.असा शैक्षणिक प्रवास करत त्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले व त्यांनी एमपीएससी परीक्षेच्या तयारीला लागला,त्यांनी एमपीएससी तयारी घरी बसुनच केली. पाच वर्षापासुन तो तयारी करत होता चार वेळा त्यांना अपयश आल पण खचला नाही, सतत अभ्यास करायचा आणि पाचव्यादा त्यांनी यश संपादन केले. नुकतीच त्यांची महसुल सहाय्यक पदी निवड झाली संदीप यांचे वडील चौथी पास तर आई विमलबाई देवकांबळे ही अंगठे बहाद्दर असुन तिनं आपल्या मुलाला शिकवायचं अन् मोठ्ठा साहेब बनवायचं! अस त्या मातेच जीवनातील स्वप्न होते,आमच्याशी बोलतांना विमलबाई म्हणाल्या आम्ही रोज एकाच्या शेतात मजुरीन जायचं राबराब राबायचं! हे आपल्या लेकराच्या नशीबी येऊ नये म्हणुन कष्ट करुन घामाच्या वगळाने रोज आंघोळ व्हायची!पण लेकराचे शिक्षण पुर्ण केले, एक मोठा मुलगा तुकाराम हा माध्यमिक शिक्षक या पदावर नौकरी करत आहे,तर दुसरा संदीप मुकुंद देवकांबळे यांनी एमपीएससी मधुन महसुल साहाय्यक पदी निवड झाली आहे,
“माझ्या कष्टाचे फळ मला मिळाले!” असल्याचे संदीप देवकांबळे यांच्या आई सौ.विमलबाई देवकांबळे यांनी सांगितले संदीपचे वडील यांचे शिक्षण चौथी पर्यत झालेले असुन वडीलांनी ही जीवनातील अनेक वर्ष मजुरी केली,चालक म्हणुन काही दिवस गावातीलच शासकिय गुत्तेदार कै.दिगंबरराव पटणे यांच्या कडे काम केले काम करत असताना मला एक सरकारी चालक या पदासाठी नौकरीची संधी मिळाल्याचे मुंकद तुकाराम देवकांबळे यांनी सांगितले आज माझे दोन्ही मुलं सरकारी नौकरीला लागल्याचा मला अभिमानाने सांगावे वाटते कष्ट करा जिद्ध बाळगा यश आपोआप मिळते,असे संदीप देवकांबळे यांनी सांगितले,