(कंधार – दिगांबर वाघमारे )
ब्रह्माकुमारीज उप सेवाकेंद्र कंधार निमित्त उमरज मठ संस्थान (धाकटे पंढरपूर ) येथे सात दिवसीय महायज्ञ कलशारोहण विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने ब्रह्माकुमारीज उप सेवाकेंद्र कंधार च्या वतिने संचालिका बीके ज्योती बहेनजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सात दिवसीय अध्यात्मिक शिव चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.
भव्य शिवलिंगाचे पुजन महंत श्री.एकनाथ महाराज – मठाधिपती उमरज मठ संस्थान यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ब्रह्माकुमारीज कैलास नगर, नांदेड सेवा केंद्र संचालिका आदरणीय शिवकन्या बहिणजी, बी के बालाजी भाई, ब्रह्माकुमारी ज्योती बहेनजी (कंधार), यशोदा बहन, शिल्पा बहन, गंगाप्रसाद यन्नावार-भाजपा तालुकाध्यक्ष कंधार, मुंडे सर, डॉ. सदावर्ते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी भव्य शिवलिंग दर्शन व ईश्वरीय अध्यात्मिक प्रदर्शनीचा हजारो भाविक भक्त, बंधु-भगिनींनी यांचा लाभ घेतला.
यावेळी अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी प्रतिभाताई चिखलीकर, माजी नगराध्यक्ष शोभाताई नळगे, एसडीएम सौ. संगेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलपत्रेवार सर, पीएसआय गोंड सर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बोंबले सर, पत्रकार डॉ. गंगाधर तोगरे बंधु, माधवराव भालेरावसर, मोहम्मद सिकंदर सर, तोरणे बंधू यांनी अध्यात्मिक ज्ञानाचे अवलोकन करुन भविष्य कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सात दिवसीय प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी बीके सतीश भाई, श्रीकांत भाई, श्याम भाई, गजानन भाई, दशरथ भाई, उदगीरे भाई, शंकर भाई, थोटे भाई, ज्ञानोबा भाई, पुजारी भाई, महादापुरे भाई, कामाजी भाई व बीके सिमा बहेन, मयुरी बहेन, नंदिनी बहेन, भार्गवी आणि निकम माता, डॉ. डांगे माता, बामने माता, नरंगले माता, रहाटकर माता, उदगीरे माता, नाक्कावार माता, डोगंरगे माता इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.
सात दिवसीय अध्यात्मिक ईश्वरीय ज्ञानाची सांगता ईश्वरीय मेडीटेशन करून प्रसाद वाटपाने करण्यात आली.