दिनांक 08 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल हदगाव प्रशालेत आयोजित’ जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.श्रीमती.चितळे मॅडम होत्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या डॉ.श्रीमती वंदना देवराये (शासकीय रुग्णालय हदगाव), अँड.सिराजखान लायकखान (हायकोर्ट मुंबई), बशारत बेगम (महिला दक्षता समिती सदस्या), श्रीमती.हटकर मॅडम व , बोरले पवार मॅडम तसेच कन्या केंद्राचे विस्ताराधिकारी मा.गुणवंत काळे सर श्रीमती .सुरेखा विठ्ठलराव देशमुख (व्यापारी असोशियनस सदस्या )आणि, अनेक वृत्तपत्राचे संपादक व पत्रकार इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ,शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात, स्त्रियांच्या स्थिती गतीचा आढावा घेऊन स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दल व हक्काविषयी विचार मांडले .तसेच गरीब, होतकरू, मजूर, निराधार कुटुंबातील मुलींच्या प्रश्नांची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच या कार्यक्रमात जिल्हा परिषद हायस्कूल हदगाव प्रशालेतील अतिशय हुशार, तडफदार ,अभ्यासू, प्रतिभावंत, कष्टाळू ,विद्यार्थी प्रिय शिक्षिका आदरणीय, श्रीमती.रतन अंबादास कराड यांचे विविध विषयावर विविध लेख ,कथा, कविता तसेच समीक्षात्मक लेख, जर्नल विविध वृत्तपत्रातून, मासिकातून, नियतकालिकातून प्रसिद्ध झालेले आहेत .आता त्यांनी अतिशय परिश्रमातून लिहिलेल्या दोन ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.त्यांनी सुलभ मराठी व्याकरण आणि बालकांचे आधुनिक मानसशास्त्र हे ग्रंथ लिहिले. विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे शास्त्रशुद्ध ज्ञान देणे. पुढील अभ्यासकांना भाषिक मार्गदर्शन देणे . या हेतूने भाषेच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. तर बालमानसशास्त्रीय दृष्टीने विचार मांडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अंगाचा विचार केला आहे.हे त्यांचे कार्य अतिशय मौलिक आणि गोरवास्पद आहे.
मातृभाषा आणि शिक्षण क्षेत्र विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास या दृष्टीने केलेले हे कार्य लक्षणीय आहे.या सुंदर सोहळ्यात त्यांच्या कार्याचा गौरवास्पद उल्लेख केला.
तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून आदरणीय सुदर्शन तवर सरांनी गोरगरीब व ज्यांना आई-वडील नाहीत अशा मुलींना ड्रेस देऊन त्यांचा सत्कार केला.तसेच शाळेतील सर्व महिला भगिनींचा व सर्व शिक्षक बांधवांचा देखील शाल पुष्पहार घालून सत्कार केला आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, अनेक वृत्तपत्राचे संपादक व पत्रकार बंधूंचा लेखणी शाल आणि पुष्पहार घालून यथोचित असा सन्मान केला .तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा देखील यथोचित असा सत्कार व सन्मान करण्यात आला . या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थिनींनी गीत, नृत्य ,वकृत्व स्पर्धा याद्वारे महिलांच्या योगदानावर भर टाकला .
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आदरणीय सुदर्शन तवर सर व श्रीमती रतन अंबादास कराड यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील श्रीमती रतन अंबादास कराड यांनी केले , प्रास्ताविक काझी सरांनी केले. तसेच माध्यमिक शिक्षक इरफान सरांनी महिला दिनानिमित्त महिलांना व मुलींना मोलाचे मार्गदर्शन केले . कार्यक्रमासाठी लाभलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांनी देखील सर्व महिला भगिनींना सखोल असे मार्गदर्शन केले.व मुधोळकर सरांनी सर्वांचे आभार मानले .आणि कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना सुदर्शन तवर सरांनी जिलेबी वाटप करून, कार्यक्रमाची सांगता ही ‘राष्ट्रगीताने’ केली .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केले.

