नांदेड,दि.15-नांदेड येथील रहिवासी व अमरावतीच्या विभागीय उद्योग कार्यालयातील सेवानिवृत्त उद्योग अधिकारी शंकरराव गोंड यांचा रविवार दि.16 रोजी कार्यगौरव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
येथील अतिथी हॉटेलमध्ये सायंकाळी 5 वाजता आयोजित केलेल्या या कार्यगौरव सोहळयाच्या अध्यक्षस्थानी लातूर येथील श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर हे राहणार आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून लातूर येथील ज्येष्ठ साहित्यिक रमेशराव चिल्ले, छत्रपती संभाजीनगरचे उद्योगपती दिलीपराव मिरजगावे, लातूरचे उद्योजक कुमारअप्पा उटगे व छत्रपती संभाजीनगर विभागाचे सेवानिवृत्त उद्योग सहसंचालक प्रवीण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तरी या कार्यगौरव सोहळयास उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक भाजपा प्रवक्ते संतोष पांडागळे यांच्यासह सुरेश नागठाणे, डॉ.माधव गोंड, संजय कहाळेकर, नारायण गोंड,मधुकर फुलवळे, संदिप टाकळे, योगेश कल्पे, गणेश गोंड यांनी केले आहे.