अहमदपूर ( प्रतिनिधी ) येथील नागेश काॅलनीतील रहिवासी आणि भारतीय जीवन विमा प्रतिनिधी सौ कृष्णा विठ्ठलराव गबाळे यांचा मोठा मुलगा विशाल गबाळेचा बी एम सी सहाय्यक पदी निवडीबद्दल श्री बाबुराव आरसुडे यांनी पुष्पहार देऊन, शाल पांघरुन आणि पेढा भरवून सत्कार केला.
विशाल गबाळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. बी एम सी सहाय्यक पदासाठी सप्टेंबर 24 मध्ये परीक्षा झाली होती. नुकताच त्या परीक्षेचा निकाल आणि निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. यात विशाल गबाळेची बी एम सी सहाय्यक पदी निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. दरम्यान, विशालच्या या यश आणि निवडीबद्दल बुधवार दि 09 एप्रिल 25 रोजी सायंकाळी श्री बाबुराव आरसुडे यांनी पुष्पहार घालून, शाल पांघरुन आणि पेढा भरवून सत्कार केला. आईवडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवून शांत मनाने अभ्यास केला तर यश हमखास मिळते. असं मनोगत सत्काराला उत्तर देताना विशाल गबाळे यांनी व्यक्त केले. त्यावेळी श्री धोंडिराम माळी, श्री प्रकाशराव कंदगुळे, श्री भदाडे, श्री आणि सौ सगर, श्री विठ्ठलराव गबाळे आणि प्रा भगवान आमलापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.