श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी, अरण, ता.माढा, जि.सोलापूर या तीर्थक्षेत्रास विशेष बाब म्हणून तीर्थक्षेत्राचा ‘अ वर्ग’ दर्जा देण्याबाबतचा #शासननिर्णय ग्राम विकास विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे.
श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी, अरण, ता. माढा, जि. सोलापूर या तीर्थक्षेत्रास “अ” वर्ग दर्जा देणेबाबत.
महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन निर्णय क्रमांकः तीर्थवि-२०२५/ ई-१०१०२६६/यो-११
बांधकाम भवन, २५ मर्झवान पथ
फोर्ट, मुंबई ४०० ००१
दिनांकः १३ मे, २०२५
वाचा:-
१) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. तीर्थवि-२०११/प्र.क्र.६५१/ योजना-६ दि.१६ नोव्हेंबर, २०१२.
२) शिखर समितीच्या बैठकीचे इतिवृत्त दि.०५.०९.२०२४
प्रस्तावना:-
मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षेतेखाली दि.०५.०९.२०२४ रोजी ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मान्यता देण्याच्या अनुषंगाने शिखर समितीची बैठक पार पडली. शिखर समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी, अरण, ता. माढा, जि. सोलापूर या तीर्थक्षेत्रास “अ वर्ग” दर्जा देण्याची वाव शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी, अरण, ता. माढा, जि. सोलापूर या तीर्थक्षेत्रास विशेष बाब म्हणून तीर्थक्षेत्राचा “अ” वर्ग दर्जा या शासन निर्णयाद्वारे देण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०५१३१४४५०९०५७७२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
KALU GONYA VALVI
DEPARTMENT
(का. गो. वळवी) सह सचिव, महाराष्ट्र शासन
प्रत,
१) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य मलबार हिल, मुंबई.
२) मा. मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
३) मा. उपमुख्यमंत्री (नगरविकास) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
४) मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
५) मा. मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव.