(कंधार ; दिगांबर वाघमारे )
11वी प्रवेश प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली असून कंधार शिक्षण विभागाच्या वतीने तालुका स्तरावर प्रवेश प्रक्रिया सुरूळीत चालण्यासाठी व ऑनलाईन प्रक्रिया समजन्यास अडचन होणार नाही यासाठी कंधार गटसाधन केंद्र BRC येथे प्रवेश प्रक्रिया सहायता कक्ष दि ७ मे पासून ‘स्थापन करण्यात आला असून कंधार तालुक्यातील पालक व विद्यार्थांनी प्रत्यक्ष भेट देवून ११ वी प्रवेशा बाबत मार्गदर्शन घेण्याचे आवाहन कंधारचे गटशिक्षणाधिकारी संजय यरमे यांनी केले .
11 वी प्रवेश प्रक्रिया सहायता कक्ष समिती सदस्य खालील प्रमाणे आहेत.
1)श्री मेटकर व्हि.ए.,शिक्षण विस्तार अधिकारी(अध्यक्ष-7588632622)
2)श्री शेख ई.यु.,केंद्रप्रमुख (सचिव- 9665556111)
3)श्री मलगीरवार एस.एस.,विशेष शिक्षण तज्ञ(तंत्रस्नेही शिक्षक -9970847680)
4)श्री काळे पी.जी.,विशेष शिक्षण तज्ञ
(तंत्रस्नेही शिक्षक-9975071533)5)श्री गवळे एस. के.,विशेष शिक्षक
(तंत्रस्नेही शिक्षक-8766822618)तसेच विद्यार्थी व पालक यांना नोंदणी करताना काही तांत्रिक अडचण येत असल्यास तालुका स्तरावरील सहायता केंद्र, या खेरीज आणखी काही अडचणी असतीलतर जिल्हा स्तरावरील सहायता कक्षाशी सम्पर्क करावा. जिल्हा स्तरावरील सम्पर्क कक्षात खालील प्रमाणे सहायता करण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय जिल्हा परिषद नांदेड श्री पोकले हनुमंत सर 9422896635, 8624003268, श्री काजी सर 9423920125, श्री सिद्धार्थ पवळे सर 8087314886, श्री संभाजी अलाबदे सर 9766531010. ज्या अडचणी जिल्हा स्तरावर सूटत नसतील त्यासाठीच विभाग स्तरावरील कंपनी कडून नियुक्त करण्यात आलेले तांत्रिक सहाय्यक श्री कुलदीप धर्माधिकारी 7218393979, यांचेशी संपर्क साधावा असेही आवाहन गटशिक्षणाधिकारी संजय यरमे यांनी केले आहे.
विशेष महत्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ऑफ़लाइन प्रवेश होणार नाहीत याकडे प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. प्राचार्य व मुख्याध्यापक, उच्च माध्यमिक-कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालय संलग्न सर्वांनी याची नोंद घ्यावी असेही गटशिक्षणाधिकारी संजय यरमे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.