बिन नाकाचं देश : पाकिस्तान

 

एकमेकांवर कुरघोडी करणे हा प्राण्यांचा आणि पक्षांचा स्थाईभाव आहे.आपण आपल्या आजूबाजूस नेहमी पहातो.कुत्र्यांची पिल्ले,डूकरांची पिल्ले,कोंबड्यांची पिल्ले आगदी जन्मल्यापासून एकमेकांवर वरचढ ठरण्याचा प्रयत्न करतात.मनुष्य हाही प्राणीच आहे.त्यातही दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवण्याची खुमखुमी असतेच.कुटूम्बातील सदस्य सुद्धा एकमेकांवर वरचढ ठरण्याचा नेहमी व नियमित प्रयत्न करत असतास.जसं कुटूम्बांचं तेच गावचं,जे गावचं तेच सर्कल ,तालुका जिल्हा,विभाग,राज्य आणि देशपातळीवर घडत असते.जांच्या त्यांच्या कुवतीनुसार हुकूम गाजवीत असतात.हूकूम गाजविण्याची प्रवृती जागातील प्रत्येक देशातही ठासून भरलेली आहे.यासाठी जगात नेहमीच कुठेना कुठे दोन देशात युद्ध चालू असते.संघर्ष चालू असते.
आपला बिन नाकाचा शेजारी देशही वर्षाच्या बारा महिने आपल्या सोबत कुरापती करत असतो.या बिन नाकाच्या देशाला दुसऱ्या एका नकट्या देशाची साथ मिळत आहे.आपल्या बिन नाकाच्या शेजाऱ्याने या नकट्या मित्राच्या मांडीवर बसून आपल्यासोबत सारख्या कुरापती काडत आसतो.या नकट्या मित्राला फक्त व्यापर वाढवायचा आहे.त्याची शस्त्रास्त्र विकावयाची आहेत. नकटा मतलबी आहे तर आपला शेजारी लाचार आहे.लाचार अंतकीस्तान त्याच्याकडून जवळपास सत्तर टक्के पेक्षा जास्त शस्त्र खरेदी करीत असतो.आता त्याच शस्त्रांनी,त्या शस्त्रांच्या भरोशावर आपल्यावर हल्ला केला व स्वतःचाच कपाळमोक्ष करुन घेतला.
भिकारड्या पाकला आपल्यासोबत आगळीक करायची कधी कधी हुक्की उटते. बिनडोक पाकिस्तान आपल्या विरोधात सरळ युद्ध करु शकत नाही.तसा दम पाकमध्ये नाही. म्हणून तो अतिरेक्याचा सहारा घेतो.अतिरेक्यांचा सहारा घेवून २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरात पर्यटनासाठी,सहलीसाठी गेलेल्या २६ पुरुषांना त्यांच्या मुलाबाळासमोर गोळ्या घालून ठार केले.त्यांनी सिंदूरालाच हात घातला होता. सिंदूराची ( कुंकू ) ताकद, महती त्यांना काय कळणार ?
भ्याड हल्ला करून तो मी नव्हेच या भूमिकेत पाक बोलत राहीला.काहीनी तर हल्ला येथील शासनानेच घडकून आणला असा कांगावा केला.पण सर्व सामान्य भारतीय,भारत सरकार व विरोधी पक्ष यांनी आपपासातील मतभेद विसरून एक वज्रमुठ बांधली.पाकांड्याला भारताच्या ताकदीचा अंदाज आला नाही.यापूर्वीही भारताने ताकद दाखवली होती पण ती मर्यादेबाहेर नव्हती. पण पहलगाम हल्ल्याने पाकला धडा शिकवला. सिंदूर ऑपरेशन राबवून पाकला सिंदूरचे महत्व पटवून दिले.भारतीय स्त्रीयांच्या सिंदूरमध्ये किती ताकद आहे हे देशाने पाकला दाखवून दिले.
१९७१ नंतर भारताने पाकिस्तानात घुसून पाकाड्याला जबरदस्त दनका दिला. इस्लामाबादपर्यंत त्याच्या घरात घुसून दाणादान उडवली.तरी सिंदूरचं काय महत्व आहे हे त्यांना कळायला फार दिवस लागले नाहीत.जॉहाबाज भारतीय सैनिकांनी त्यांची ताकद,हिंमत हे केवळ पाकलाच दाखवून दिले नाही तर संपूर्ण जग आवक होवून गेले.
बिन नाकाच्या देशाने नकट्या देशाकडून घेतलेली शस्त्रास्त्रे किती कुचकामी आहेत हे ही भारतीय सैनिकाने सर्व जगाला दाखून दिले. बुध्दाचा मार्ग स्विकारू पण यापुढे अन्याय सहन करणार नाही.हेच भारताने जगाला दाखवून दिलेले आहे.अणुबॉम्ब परिक्षणाला भारताने आन बुद्ध हसला हे नाव दिले होते.
गंमत कशी आहे पहा.भारताने अतिरेक्याविरुद्ध कार्यवाही केली.पाकविरुध्द नाही.हे सर्व जगाला माहित असताना बिन नाकाचा बेशरम पाकिस्तान त्यानेच पोसलेल्या भस्मासूरांची बाजू घेवून आपल्यावर हल्ला करतोय.चोरांच्या उलट्या बोंबा यालाच म्हणतात. पाकिस्तानला भारतीय सैन्याच्या ताकदीचा अंदाज आला नाही.भारतीयांच्या एकजूटीचा अंदाज बांधता आला नाही.भारतीय शासन व विरोधी पक्षांच्या इच्छाशक्तीचा अंदाज त्यांनी माहिती करून घेतलेली नाही.पाक सैन्य आलगद आपल्या जाळ्यात आडकलं.सिंदूर मिटवण्याचे दाहक परिणाम कळाल्यानंतरही त्यांनी सिंदूर ऑपरेशन विरुध्द बुनयान अल मरसूस नावचं ऑपरेशन त्यांनी सुरु केलं.
बुनयान अल मरसूस याचा अर्थ काय आहे ? ” बुनयान अल मरसूस ” हा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ आहे लोखंडी किंवा शिशापासून बनवलेली मजबूत दनकट भिंत. पण या भिंतीला भारतीय सैनिकांनी केव्हाच भगदाड पाडून जमीनदोस्त केलं हे पाक शासन व तेथील सैनिकी सत्तेला कळालच नाही.जेव्हा कळालं तेव्हा त्यांची भंबेरी उडालेली होती.भारतच्या सिंदूराची ताकद कळाली होती.
भारताने पाकिस्तानाच्या छाताडावर जो वार केला तो सामन्य पाकिस्तानी नागरीक यांचा सूड घेण्यासाठी केलेला नाही.भारताला सूड घ्यावयाचे आहे पुसल्या गेलेल्या सिंदूराचे.तेथील अतिरेक्यांना पाठिंबा देणाऱ्या शासन व मुनीर यांच्या सैन्य शक्तीला तडाखा देवून जगासमोर त्यांचं थोबाड लाल करावयाचे होते यात भारतीय शासन व सैन्य यशस्वी झालेले आहे.आता तर भारतीय जनताच पाकिस्तानच्या मित्र राष्ट्रांना धडा शिकवण्यासाठी चंग बांधलेला आहे.पाकला मदत करणाऱ्या तूर्की,अझरबैजान व चीन हे राष्ट्र सध्याला तरी भारतीयाच्या रडारवर आहेत .ट्युरिस्ट आणि व्यापरी यांनी वरील देशात पर्यटक पाठवणार नाहीत.व्यापारी त्यांच्याबरोबर व्यापर करणार नाहीत. हा अधुनिक भारताचा दनका आहे .
भारतीय पंतप्रधान त्यांच्या बोलण्यातून केवळ पाक,चीनला नव्हे तर संपूर्ण जगाला संदेश दिलेला आहे.त्यांनी स्पष्ट शब्दांत ठणकावून सांगितलेलं आहे की दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी शक्य नाही.दहशतवाद आणि व्यापर एकाच वेळी हातात घालून चालू शकत नाही . पाणी आणि रक्त एकसाथ वाहू शकत नाहीत . जगातील सर्व देशांनी दशहतवादकडे झिरो टॉलरन्स म्हणून पाहिले पाहिजे.जोपर्यंत दहशतवाद नष्ट होत नाही तोपर्यंत शांती नांदूच शकत नाही.पाक आज दहशतवाद्याच्या पाठिंशी गंभीरपणे उभा आहे.त्यांना आर्थिक मदत,शस्त्र पुरवत आहे.परंतू हाच दहशतवाद एकेदिवशी पाकिस्तानचा अंत करेल.जगाच्या नकाशावर पाकिस्तान राहणार नाही हे निश्चित आहे .
भारतीय पंतप्रधानानी स्पष्टपणे पाक व त्याच्या री ओढणाऱ्या मित्र राष्ट्राला ठणकावून इशारा दिलेला आहे की यापुढे पाकशी संवाद होईल फक्त पाक नियंत्रीत काश्मीरबदल,चर्चा होईल फक्त दहशतवादावर.भारताचे ठोस धोरण जगासमोर आलेले आहे.पाक उठसूठ भारताला आण्विक हल्याची धमकी देवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो.यासाठी भारताने पाकिस्तानला कान पिळून सांगितले आहे आशी धमकी भारत यापुढे सहन करणार नाही.
पूर्वीपासूनच बळी तो कान पीळी आशीच जगाची रीत आहे.आता भारतालाही कळालेलं आहे की बल,एकता,सामर्थ्य आणि संकल्प यातूनच शांततेचा मार्ग जातो.भारत आता याचना करणारा देश नाही तर समोरच्या देशाला याचना करावयास भाग पाडणारा सामर्थ्यशाली देश आहे.
आज भारतीयांना १९७१चे युद्ध आठवते आहे.कारण आहे केवळ चौदा दिवसात पाकिसानचे ९० हजार सैनिकांनी शरणागती पत्करली होती. व बांग्लादेशाची निर्मिती झाली होती. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे कणखर धोरण याला कारणीभूत होते.पाकिस्तानमध्ये भारतीय सैनिक कराचीपर्यंत घुसले होते.आजही बहुसंख्य भारतीयांची हीच अपेक्षा होती की पीओके आपल्या ताब्यात यावं व बलूचीस्तानाची निर्मिती व्हावी.भारतीयांचे ही स्वप्नही भविष्यात पूर्ण होतील .
युद्धात लबाडी चालते.युध्दात कोणताही देश शंभर टक्के खरं सांगत नाही. आपलं नुकसान काय झालं ?किती झालं ? हे सांगत नाहीत. दुष्मनाचं नुकसान मात्र कदाचीत वाढवून सांगतात. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात भारताने किती विमानं पाडली याचा आकडा दररोज सांगीतलंय जायचं. युद्धानंतर जेव्हा सत्य समोर आलं तेव्‍हा पाकिस्तानची पाडलेल्या विमानाचा आकडा हा दोन्ही देशाकडे जेवढी लढावू विमानं त्यापेक्षा जास्त होते.लबाड सांगण्याचा उदेश जनतेत उत्साह राहावा.देशप्रेम वाढावा.हिंमत खचू नये.
आजही पाकिस्तान लबाड खोट्या बातम्या पसरवित आहे.पण आजच जग येवढं जवळ आलेलं आहे की कुठं काय घडते आहे ते घरबसल्या पाहात आहे.आवकाशातील यान छायाचित्र पाठवित आहेत.पाक कितीही कोल्हेकुई केली तरी आता वाघ घाबरणार नाही.पंजात एकदा सापडलं तर सोडणारही नाही.
भारतीय सैन्याने पाकच्या घरात घुसून दहशतवाद्यांना मारल्याबदल सर्व भारतीय त्यांना आदराणे,अभिमानाने सॅलूट करत आहे.भारतीय सैनिकांचं पराक्रम जगासमोर आलेलं आहे. सिंदूरविषयीची देशाची भावना,किंमत जगाला कळालेली आहे.आपले सैनिक न्याय मिळवून देण्यासाठी पाकिस्तानी दहशतवादी तळावर हाल्ले केले.पाकिस्तानी नागरीकांना त्रास दिलेला नाही. त्यासाठी हल्ला केलेला नाही.
भारतीय सैनिकाच्या तिन्ही दलात एक सूसूत्रता होती.त्यांच्यात अचूक समन्वय होतं. न्यूजवॉरफेयर मध्ये अग्रगण्य कामगीरी भारतीय सैनिकांनी केलेली आहे.म्हणूनच सर्व भारतीयांची छाती छप्पन इंची झालेली आहे.सगळेच म्हणत आहेत १९७१नंतर प्रथमचं मोठा दनका दिलं की पाकांड्याला.
पाकिस्तान लष्कराने उभ्या केलेल्या भस्मासुरांचा हौदस,नंगानाच भविष्यात ही चालूच राहणार आहे.जोपर्यंत पाकमध्ये सैनिकी हुकमत राहणार आहे तोपर्यंत हे चालतच राहणार आहे.युद्धाने वचक बसेलही ;पण दहशतवादचा प्रश्न सुटेल का ? काय सांगावे कदाचीत अधिक चिघळेल.पाकिस्तानचे शेपूट नेहमीच वाकडेच आहे. यापुढेही वाकडे राहणार आहे.तेथील शासन डोक्याने चालत नाही.सैनिकांच्या मनगटावर, इशाऱ्यावर चालते .
आपल्या सैनिकांच्या कुशलतेचं, ध्यैर्याचं,धाडसाचं कौतूक करावं तेवढं कमीच आहे.बावीस एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे निर्दोष व्यक्तीवर हल्ला करुन अमानुष हत्या केली.त्यादिवशी दहशतवाद्यांचा क्रुर चेहरा देशासमोर व जगासमोर आला.देशात संतापाची लाट उसळली.देशभक्त नागरीकांत बदला घेण्याची भावाना उसळी मारू लागली. त्याच वेळी आपल्या शासनाने देशभावनेची कदर करुन सैनिकाला कारवाई करण्यासाठी मोकळीक दिली.त्यामुळे भारतीय सैनिक क्षणांचाही विलंब न लावता सहा व सात मे रोजी पाकिस्तानी दहशतवादी ठिकाणावर निर्णायक हल्ला चढवला.दहशतवाद्यांचे बारा तळ उद्धवस्त केले. नऊ विमानतळाला नुकसान पोहचवलं .भारताने दहशतवाद्यांवर कारवाई केली.पाक आपल्यावर आक्रमण केलं.त्यास भारताने सडेतोड उत्तर दिलं.हवाई दल,भू दल व आरमार दलांनी मिळून पाकला प्रत्युतर दिलं.
भारताकडील एस फोर हड्रेड,आकाश, नाग,स्कायस्ट्राईकर,अन्टी ड्रोन डी फोर, ब्रम्हास आणि पृथ्वी या आस्त्र शस्त्रांनी भारताने पाकिस्तानचं कंबरडच मोडलं.भारताच्या प्रचंड ताकदीपुढे पाकिस्तानने गुडघे टेकले.जगातील अनेक राष्ट्रांना विनंती करून युध्द बंदी घडवून आणली.
भारतीयांना एक प्रश्न पडलेला आहे की आजपर्यंत भारताने पाकिस्तान संदर्भात तिसऱ्या देशांचं हस्तक्षेप कधीच स्विकारलेलं नाही.मग यावेळी खरचं तिसऱ्या देशाचं ऐकून पाकला नमविण्याची सुवर्णसंधी आपण गमावली का ?पीओके घेण्याची संधी आपण घालवली कां ?बलूची लोक स्वातंत्र्याची पहाट पहाण्यासाठी आसुसलेले आहेत ती संधीही गेली ? तिसरा देश मध्यस्थी केली ? याची मला खात्री वाटत नाही.
आपण नेहमीच युद्धात जिंकतोत व तहात हारतोत.यावेळीही असेच झाले.बीनडोक अर्धवटराव डोनाल्ड ट्रॅम्पनं खरचं दोन्ही देशाना युद्ध थांबविण्यासाठी मध्यस्ती केली ? काहीही आसो,भारताने पाकिस्तानचे नाक केव्हाच कापून टाकले आहे.पण पाकिस्तान म्हणतोय कोण म्हणतंय मला बीन नाकाचं.श्वास घ्यायला दोन छिद्र आहेत ना मला.बेशरम पाकिस्तान.
जय हिंद . जय भारत.

राठोड मोतीराम रुपसिंग
नांदेड -६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *