(कंधार ; प्रतिनिधी )
भारतीय महिलांचे शिंदूर पुसणाऱ्या पाक अतिरेकी व पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेतील भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा गौरव आणि राष्ट्रीय एकतेची भावना अधिक दृढ करण्यासाठी,शहीद जवानांच्या पत्नीच्या सन्मानाच्या हेतूने शुक्रवार ता.२३ मे रोजी सकाळी ९ वाजता शहरातील छ. शिवाजी महाराज चौक ते येथील हुतात्मा स्मारक पर्यंत ऑपरेशन सिंधूर सन्मानार्थ तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या तिरंगा यात्रेत राष्ट्रप्रेमी महिला पुरुषांनी , विद्यार्थी, कामगार ,व्यापाऱ्यांनी विविध संघटनेच्या पदाधिकारी यांनी मोठ्या
संख्येने सहभाग नोंदवला .भारतीय सैनिकांच्या जयघोषाने कंधार शहर दुमदुमून निघाले.जम्मू-काश्मिरातील पहलगाम येथे निष्पाप पर्यटक व भारतीय नागरिकावर पाकिस्ताननेअतिरेकी हल्ला केला या अतिरेकी हल्ल्यात 28 नागरिकांचा बळी गेला. अतिरिक्याच्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले व सुमारे १०० अतिरेक्यांना यमसदनी पाठवले. भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ राज्यभरात अनेक ठिकाणी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले.
त्याचाच एक भाग म्हणून कंधार येथे तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले या तिरंगा यात्रेत.शंभर फुटी भारतीय ध्वज विद्यार्थ्यांनी हाती धरला होता तर प्रत्येक नागरिकांच्या हातात भारतीय ध्वज घेऊन सैनिकांचा जय जय कार करीत या तिरंगा यंत्रेची सुरुवात उमरजसंस्थांचे मठाधिपती संत एकनाथ महाराज हस्ते करण्यात आला.
सदर यात्रा निःस्वार्थपणे देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांच्या अतुलनीय शौर्यासाठी ,शहीद झालेल्या जवानांच्या पत्नीसाठी,शहीद जवानांच्या सन्मानासाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, भारतीय सैनिक ,माजी सैनिक, व्यापारी, विद्यार्थी, नागरिक ,युवक ,युवती, मोठ्या संख्येने सहभागी होते यावेळी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजीराव चुकलवाड, पोचीराम वाघमारे, बापूराव कल्याणकर, संभाजी कल्याणकर ,वैजनाथ जायभाये ,रामकिशन मानसपुरे ,विश्वंभर गारोळे ,नाना चिवडे रमेश पवार, या माजी सैनिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या तिरंगा यात्रेमध्ये भाजपचे देविदास राठोड ,एकनाथ पवार ,बालाजी पांडागळे ,डॉ संजय पवार ,विजय धोंडगे, गणेश कुंटेवार,भगवान राठोड चित्रलेखा गोरे, सुनंदा वंजे,चित्राताई लुंगारे कल्पना गीते , प्रजापिता ब्रह्मकुमारी ज्योतीबाई ,डॉ रामभाऊ तायडे डॉ रणदिवे प्रा योगेश मुंडे प्रा बंदुके प्रा संजय राठोड सचिन गोमसे सर, चेतन केंद्रे , रवि केंद्रे, भुषण पेठकर, उमेश चव्हाण, अजय मोरे,भारत पाटील चिखलीकर, आनंदराव किडे, दत्ता पाटील पेठकर, योगेंद्रसिंह ठाकूर. माधव कांबळे, बबन जोंधळे, यांच्यासह व्यापारी ,विद्यार्थी , कामगार, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी अनेक पक्षाचे पुढारी सहभागी झाले होते.
कंधार येथील तिरंगा रॅली यशस्वी करण्यासाठी शिवा मामडे, गंगाप्रसाद यनावार ,उत्तम चव्हाण ,निलेश गोर ,सत्यनारायण मानसपुरे ,सागर डोंगरजकर ,गणेश ठाकूर ,प्रवीण बनसोडे, केदार मुत्तेपावर, विकी बिडवई ,शिवशंकर सावरकर, विजय मोरे यांनी परिश्रम घेतले.


