कंधार ; प्रतिनिधी
शिवा अखिल भारतीय वीरशैव संघटनेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची 894 जयंती निमित्त आज कंधार शहरात भव्य मिरवणूक व समारोपिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या जंयती मिरणुकीत गुरुपदेश करण्यासाठी सोमलिंग शिवाचार्य बिचकुंदेकर महाराज, राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य अहमदपुरकर महाराज, दिगंबर शिवाचार्य वसमतकर महाराज, आचार्य गुरुराज स्वामी महाराज अहमदपुरकर उपस्थित राहुन आशीर्वाचन देणार आहेत.
समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. मनोहर धोंडे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शिवा संघटना,उद्घाटक म्हणून संजय भोसीकर तालुका अध्यक्ष, काँग्रेस तर पाहुणे म्हणून वैजनाथ तोनसुरे राज्य उपाध्यक्ष, धन्यकुमार शिवणकर राज्य सरचिटणीस, शिवा संघटना,विठ्ठल ताकबीडे प्रदेश प्रवक्ता जनशक्ती पार्टी,संजय कोठाळे प्रदेश सरचिटणीस,संतोष शेटकार राज्य उपाध्याक्ष ,विरभद्र बसापुरे मराठवाडा अध्यक्ष , दिगंबर मांजरमकर मराठवाडा उपाध्यक्ष, कर्मचारी महासंघ,शिवदास धर्मापुरीकर राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष,उत्तम भागानगरे जिल्हाध्यक्ष किसान आघाडी जनशक्ति पार्टी,दत्ता कारामुंगे सामाजीक कार्यकर्ते,गणेश कुंटेवार नगरसेवक,गंगाप्रसाद यन्नावार शहराध्यक्ष भा. ज. पा.,डॉ. वैजनाथ हंगरगे मराठवाडा सघटक,इंजि. अनिल माळगे जिल्हा संपर्कप्रमुख शिवा संघटना, संभाजी पावडे जिल्हाप्रमुख दक्षिण,रविंद्र पांडागळे जिल्हा प्रमुख, क.म.. नादेड उत्तर,शहाजी नळगे नगरसेवक,शुभम घोडके जिल्हा प्रमुख, शिवा विद्यार्थी आघाडी
,रामचंद्र येईलबाड राष्ट्रवादी काँग्रेस, ओबीसी सेल,गोविंद हाबगुंडे लोहा तालुकाध्यक्ष, सेवा जनशक्ती पार्टी,अरुण बोधनकर नगरसेवक,नंदाताई पाटील जिल्हाप्रमुख शिवा महिला आघाडी, देवराव पांडागळे लोहा-कंधार प्रमुख, प्रल्हाद घोरबांड तालुकाध्यक्ष , संभाजी बुड्ढे जिल्हाध्यक्ष शिवा संघटना, शेख हैदरभाई अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष सेवा जनशक्ती पार्टी,विलास कापसे जिल्हा प्रमुख, नंदाताई पाटील जिल्हाप्रमुख महिला आघाडी,नंदुअप्पा देवणे जिल्हा प्रमुख, सिध्देवर स्वामी जिल्हाध्यक्ष शिवा धार्मिक आघाडी, हे उपस्थित राहणार आहेत.ही जंयती मिरणूक साठेनगर मधील माईचे मंदिर येथून निघणार असुन ही मिरणुक गांधी चौक, सराफा लाईन, छत्रपती शिवाजी चौक मेनरोड मार्ग निघणार असुन भवानी नगर बालाजी मंदिर येथे मिरणुकीचा समारोप होणार आहे. या मिरणूकीत सर्व जाती धर्मातील बांधवांनी सहभागी व्हावे असे अहवान मयुर नळदकर, मधुकर मुसळे, शेख अब्बुभाई,साईनाथ मळगे, जी एस मंगनाळे यांनी केले आहे.