मुखेड: (दादाराव आगलावे)
इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरुवात झाली असून सर्व माध्यमिक विद्यालय स्तरावर तसेच कॉलेज स्तरावर विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
यावरही काही विद्यार्थी व पालकांना अडचण भासल्यास गटशिक्षणाधिकारी कार्यालय येथे मार्गदर्शन कक्षाची स्थापना केली आहे तरी सदरील कक्षाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन प्र. गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव येवतीकर यांनी केले आहे.विद्यार्थी व पालक यांना नोंदणी करताना काही तांत्रिक अडचन येत असल्यास तालुका स्तरावरील सहायता केंद्र, या खेरीज आणखी काही अडचणी असतीलतर जिल्हा स्तरावरील सहायता कक्षाशी सम्पर्क करावा. जिल्हा स्तरावरील सम्पर्क कक्षात खालील प्रमाणे सहायता करण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय जिल्हा परिषद नांदेड श्री पोकले हनुमंत सर 9422896635, 8624003268, श्री काजी सर 9423920125, श्री सिद्धार्थ पवळे सर 8087314886, श्री संभाजी अलाबदे सर 9766531010. ज्या अडचणी जिल्हा स्तरावर सूटत नसतील त्यासाठीच विभाग स्तरावरील कंपनी कडून नियुक्त करण्यात आलेले तांत्रिक सहाय्यक श्री कुलदीप धर्माधिकारी 7218393979, यांचेशी संपर्क साधावा असेही आव्हान प्रभारी गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव येवतीकर यांनी केले आहे. श्री योतीकर पुढे म्हणाले की, विशेष महत्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ऑफ़लाइन प्रवेश होणार नाहीत याकडे प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. प्राचार्य व मुख्याध्यापक, उच्च माध्यमिक-कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालय संलग्न सर्वांनी याची नोंद घ्यावी असे प्र. गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव येवतीकर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.