जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तलाठी,मंडळ अधिकारी यांना निलंबित करा – माजी सैनिक बालाजी चुकलवाड

 

कंधार : प्रतिनिधी

तलाठी ,मंडळ अधिकाऱ्यांकडून पाचशे रुपयांच्या बॉण्ड वर चुकीच्या पद्धतीने जमिनी एकमेकांच्या नावावर करून फेर करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या व मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या तलाठी ,मंडळ अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दि 21 मे रोजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी निवेदनाद्वारे तहसिलदार यांना दिला आहे .

कंधार तालुक्यामध्ये शेतकरी बांधवांची महसूल अधिकारी तलाठी तथा मंडळ अधिकारी यांच्याकडून जमिनीचे वाटणी पत्र करून पाचशे रुपयांच्या बॉण्ड वर चुकीच्या पद्धतीने जमिनी एकमेकांच्या नावावर करून फेर करण्यात येत होता आणि त्याच्या मोबदल्यात तलाठी मंडळ अधिकाऱ्यांकडून गरीब शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत असत अर्थात एका परिवारामध्ये जमीन जर एकमेकांच्या नावावरती करायचे असेल तर त्यांच्याकडून विस ते पंचेविस हजार रुपये लाच घेऊन तलाठी , मंडळ अधिकारी या जमिनी नावावर करून देत असत त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्यामुळे काही शेतकरी माजी सैनिक संघटने कडे आले असता संघटनेने जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे निवेदन देऊन बॉण्ड पेपर वरची पद्धत बंद करून महसूल कलम 85 दोन नुसार निःशुल्क जमिनी नावावर करण्यात यावेत म्हणून विनंती केली होती . त्याप्रमाणे जिल्हाधिकारी नांदेड यांनी निवेदनाची दखल घेत कंधार तहसीलदार यांना आदेशित केले की शेतकऱ्यांच्या जमिनी हे 85 दोन नुसारच करण्यात याव्यात त्या अनुषंगाने तात्कालीन तहसीलदार तथा आयएएस अधिकारी आनुष्का शर्मा यांनी तलाठी , मंडळ अधिकारी यांना आदेश काढून यापुढे जर बॉण्ड वरती जमिनी लावण्यात आल्या तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल .इथून पुढे कलम 85 दोन नुसारच जमिनी लावण्यात याव्यात असा आदेश दिला होता . पण काही तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी जिल्हाअधिकारी यांच्या आदेशाला केऱ्याची टोपली दाखवून आपले घाण हात करून भ्रष्ट मार्गाने शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत बॉण्ड पेपर वरती जमिनी लावण्यास सुरुवात केली . हे माजी सैनिक संघटनेला समजताच संघटनेच्या वतीने तहसीलदार कंधार यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे .

या प्रकरणाचे सखोल चौकशी करून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाला केऱ्याची टोपली दाखवणाऱ्या तलाठी , मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई करून निलंबित करा अन्यथा माजी सैनिक संघटनेच्या वतीने 2 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यात येईल असा सज्जड इशारा माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दिला आहे .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *