अर्धापूर; प्रतिनिधी
अर्धापूर येथील कामारीकर कोचिंग क्लासेस ची विद्यार्थिनी कुमारी साक्षी शेट्टी हिने दहावीच्या निकालात घेतली गगन भरारी . अर्धापूर शहरातील शेट्टे गल्ली येथील अल्पभूधारक शेतकरी किशन दत्ता शेटे यांची लेक साक्षी किशन शेटे या विद्यार्थिनीने दहावी बोर्ड परीक्षेत 500 पैकी 476 गुण घेऊन 95 % 20 गुण घेऊन क्लासेस मध्ये सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे . याचबरोबर कामारीकर कोचिंग क्लासेसच्या आदी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. कुमारी साक्षी बालपणापासूनच अभ्यासात हुशार असून स्कॉलरशिप, एन एम एस व आदी परीक्षेत ती पात्र झाली आहे. असून असून या यशाचे पूर्ण श्रेय साक्षीने सर्व गुरुजनवर्ग आई वडील व नातेवाईकांना दिले आहे. या यशाबद्दल डॉक्टर प्रवीण कामारीकर सर , अर्चनाताई कामारीकर मॅडम , आकाश कामारीकर , डॉक्टर आदित्य कामारीकर तसेच साक्षीचे आई-वडील मीनाक्षी किशनराव शेटे , मावशी काका दैवशाला बाबाराव पांडागळे , मामी मामा राजश्री गणेश डांगे , कल्पना शिवकांत डांगे . व आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .

