प्रतिनिधी,( दिगांबर वाघमारे )
——————-
भारतीय जनता पार्टीचे दक्षिण मंडळाध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य विजय धोंडगे व माजी पंचायत समिती सदस्य सुनील धोंडगे यांच्या वतीने शुक्रवारी, ३० मे रोजी दुपारी १२.३० वाजता पांचाली मंगल कार्यालय, बहाद्दरपुरा ता.कंधार येथे रसाळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात भाजपाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष, कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघातील भाजपा मंडळ कार्यकारिणी व बुथ प्रमुखांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. या रसाळी कार्यक्रमाचा लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माजी जि.प.सदस्य तथा भाजपा कंधार दक्षिण मंडळाचे अध्यक्ष अॅड.विजय धोंडगे यांनी केले आहे.या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार अजित गोपछडे, भाजपाचे मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे, भाजपाचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, माजी आमदार तथा भाजपाचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, मुखेडचे आमदार डॉ.तुषार राठोड, नायगावचे आमदार राजेश पवार, किनवटचे आमदार भिमराव केराम, भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण, बिलोलीचे आमदार जितेश अंतापुरकर, भाजपाचे प्रदेश सचिव देविदासभाऊ राठोड, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्यबापू देशमुख, उदगीरचे माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, भाजपाचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, भाजपाचे नेते एकनाथदादा पवार, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस माधव उच्चेकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गंगाराम ठक्करवाड, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान राठोड, भाजपाचे ज्येष्ठ नेते केरबा बिडवई, तुकाराम वारकड, बाबुराव गंजेवार, देविदास गित्ते, सदाशिव अंबोरे, गणेश हम्पले, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस सौ.चित्ररेखा गोरे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व्यंकटराव गव्हाणे, भाजपा कंधार उत्तर मंडळाचे अध्यक्ष बालाजी पांडांगळे, भाजपा लोहा उत्तर मंडळाचे अध्यक्ष शरद पवार, भाजपा लोहा दक्षिण मंडळाचे अध्यक्ष चंद्रसेन पाटील, भाजपा लोहा शहर मंडळाचे अध्यक्ष गजानन सुर्यवंशी, भाजपा कंधार शहर मंडळाचे अध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार, माजी पं.स.उपसभापती सुभाष वाकोरे, माजी पं.स.सभापती प्रतिनिधी दत्तात्रय घोरबांड, माजी पं.स.सदस्य उत्तम चव्हाण, सत्यनारायण मानसपुरे, दिगांबर वडजे, केशवराव शिंदे, भाजपाचे नेते बळीराम भरकटे, दिगांबर कोरडे, वसंतराव कदम, भास्कर ढगे, दत्ता कारामुंगे, दत्तात्रय पेठकर, आनंदराव किडे, शंकरराव गरजे, अवधूत शिंदे, भास्कर जोमेगांवकर, शिवराज मोरे, चिंचोलीचे सरपंच हनमंत कौसल्ये, बाचोटीचे माजी सरपंच बालाजी घोडके, नंदनवनचे माजी सरपंच नामदेव भागानगरे, बाचोटीचे सरपंच गणपत गायकवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या रसाळी कार्यक्रमाला लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन माजी जि.प.सदस्य तथा भाजपा कंधार दक्षिण मंडळाचे अध्यक्ष अॅड.विजय धोंडगे, माजी पं.स.सदस्य डॉ.सुनिल धोंडगे, माजी जि.प.सदस्या सौ.संगिता धोंडगे, सा.बा.विभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता सुभाष धोंडगे, महात्मा गांधी प्राथमिक शाळा, बाचोटीचे मुख्याध्यापक प्रताप धोंडगे, युवा नेते संदीप धोंडगे आदींनी केले आहे.


