प्रतिनिधी, 🙁 दिगांबर वाघमारे )
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र, मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांना रविवारी, २५ मे रोजी सकाळी १० वाजता जे डब्ल्यू मॅरियेट हॉटेल, पुणे येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी कोरोना काळात कंधार आणि लोहा तालुक्यातील शासकीय व खासगी डॉक्टरांना मास्क, पीपीई किटचे वाटप केले होते. कोरोना रुग्णांसह नातेवाईकांसाठी भाऊचा डब्बा उपक्रम सुरू केला होता. गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम अविरतपणे सुरूच आहे. कोरोना
आजाराने जीव गमावलेल्यांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच कंधार आणि लोहा तालुक्यातील ६ हजार वृद्धांवार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली आहे. या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र, मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले आहे. माजी खासदार व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र पुरस्कारार्थी प्रा. पुरुत्र म इगे माजी आमदार दिवंगत भाई केशवराव धोंडगे यांचे ते सुपुत्र आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल वविधि क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

यावेळी आयुष्मान भारत मिशनचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

