नांदेड/प्रतिनिधी-मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा मुख्य संघटकपदी अविनाश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
मराठी पत्रकार परिषद मुंबईचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे सरचिटणीस तथा नांदेड जिल्हा प्रभारी सुरेश नाईकवाडे यांनी ४ जून २०२५ रोजी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेची जिल्हा कार्यकारणी घोषित केली आहे. या कार्यकारणीत सायं दै. नांदेड वार्ताचे सहसंपादक तथा पत्रकार अविनाश पाटील यांची जिल्हा
मुख्य संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन दशकापासून ते मराठी पत्रकार परिषदेची जोडलेले आहेत. यापूर्वी अविनाश पाटील यांनी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार
परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत होते. अविनाश पाटील यांची जिल्हा मुख्य संघटकपदी निवड झाल्याबद्दल सायं दै. नांदेड वार्ताचे मुख्य संपादक अॅड. कॉ. प्रदीप नागापूरकर, माजी जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे, विभागीय सरचिटणीस प्रकाश कांबळे, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, चारुदत्त चौधरी, स. रविंद्रसिंघ मोदी, सरफराज दोसानी, सुभाष काटकांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

