मुखेड ; तालुक्यातील जांब (बु.) येथील प्रतिष्ठित महिला श्रीमती शकुंतलाबाई विठ्ठलराव शृंगारे यांचे दिनांक 30 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले, सदरील दुःख संपते ना संपते तर त्यांचाच मुलगा सहशिक्षक गोरख विठ्ठलराव शृंगारे यांचे दिनांक 7 जून रोज शनिवारी निधन झाले. एका आठवड्यात माता-पुत्राचे निधन झाल्याने जांबसह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. स्व. विठ्ठलराव शृंगारे हे ग्रामसेवक पदावर कार्यरत होते त्यांचे निधन बऱ्याच वर्षांपूर्वी झाले. त्यांचा मुलगा स्व. विजय विठ्ठलराव शृंगारे हे अल्पशा आजाराने वर्षापूर्वी मृत्युमुखी पावले. एका आठवड्यातच दिनांक 30 मे रोजी आई व 7 जून रोजी मुलगा ही दुःखाची श्रृंखला न पेेलणारी घटना आहे. सदरील दुःख पेेलण्यासाठी काळच जावा लागेल. स्व. गोरख हे लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल किवळा येथे सहशिक्षक या पदावर कार्यरत होते.
अल्पशा आजारातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर जांब(बु.) येथे मूळगावी जळकोट रोड वरील शेतात दुपारी 12.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्व. गोरख हे मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे व संजय पुंडे यांचे भाचे होत. सदरील दु:खातून सावरण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना ईश्वर बळ देवो हीच प्रार्थना. ओम शांती शांती शांतीही…
–दादाराव आगलावे, मुखेड.

