
शिक्षणाधिकारी माधव सलगर,दिलीप बनसोडे यांचे शिक्षकांना आवाहन
(कंधार ; दिगांबर वाघमारे )
दि.१८ जून रोजी गटसाधन केंद्र कंधार येथे आयोजीत शैक्षणिक बैठकीत माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर , शिक्षणाधिकारी( योजना )दिलीप बनसोडे यांनी अचानक भेट देवून मार्गदर्शन केले . २१ जुन जागतीक योगा दिनाच्या निमित्ताने शाळेत योगा कार्यक्रम घेण्यात यावा ,प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांनी पालकांनी एक पेड माँ के नाम उपक्रमात झाडे लावून त्यांना जगवण्याचा संकल्प नांदेड शिक्षण विभागच्या वतीने करण्यात आला असल्याचे सांगून शिक्षण विभागाच्या सर्व उपक्रात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी( योजना )दिलीप बनसोडे यांनी केले .
नुतन शैक्षणिक वर्षाची सुरुवात नुकतीच झाली,गुणवतत्तेचा आढावा ,शाळेचे ऑनलाईन माहिती,अप्पार आयडी , आधार ,निपून महाराष्ट्र उपक्रमात वाचन , लेखन अभिलेखे आदी बाबत गटसाधन केंद्र कंधार येथे गटशिक्षणाधिकारी संजय यरमे यांनी कंधार केंद्राची बैठक आयोजित केली होती ,अचानक माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर , शिक्षणाधिकारी( योजना )दिलीप बनसोडे यांनी भेट दिली .यावेळी त्यांचा शिक्षण विभागाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी संजय यरमे , केंद्र प्रमुख माधव कांबळे यांनी सत्कार केला .
यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी खालील मुद्यावर मार्गदर्शन केले .२१ जून जागतीक योग दिन सकाळी सर्वच माध्यमाच्या शाळेत सकाळच्या सत्रात घेण्यात यावा .योग शिकवणारे विद्यार्थी शिक्षक यांना पाचारन करून त्याच्या साहाय्याने योगारून करून उपक्रमात सहभागी व्हावे . योगा चे ऑनलाईन रिजिस्टेशन .”एक पेड मॉ के नाम “
इको क्लब अंतर्गत एक कोटी झाडे लावा व जगवाण्याचा संकल्प केला .झाडे लावणे ही काळाची गरज आहे ती विविध उपक्रमातून राबवा आणि लावलेली झाडे वाचवण्याचा संकल्प शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आला मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचे आवाहन
केले .दरम्यान नवभारत साक्षर अभियानात नागरीक साक्षर व्हावे यासाठी डिजीटल साक्षरता अभियान राबवावा,प्रहरी कल्ब उपक्रमातील तंबाखु मुक्त उपक्रमातील माहिती सर्वापर्यंत पोहचवून त्यांना तंबाखू मुक्त किंवा व्यसनापासून दुर ठेवण्यासाठी प्रबोधन करण्याचे आवाहन केले.