*कंधार प्रतिनिधी संतोष कांबळे*
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे जनक, कृषीसंत वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालय नेहरूनगर येथील चतुर्थ वर्षाच्या कृषीदूतांकडून विविध कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले.
तालुक्यातील घोडज येथील १ जुलै रोजी जिल्हा परिषद शाळा आणि पशुवैद्यकीय दवाखाना येथे वृक्षरोपण करण्यात आले. तसेच घोडज येथील पशू वैदकीय केंद्र येथे जनावराचे लसीकरण हा कार्यक्रम राबविण्यात आला.यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मनोज नखाते, घोडज नगरीचे सरपंच महानंदा आत्माराम लाडेकर, ग्रामसेवक अविनाश धसरवाड, माजी सरपंच भगवान लाडेकर,माजी उपसरपंच उध्दव लाडेकर, मनोहर लाडेकर, पृथ्वीराज लाडेकर, आत्माराम लाडेकर, मारोती लाडेकर, मारोती व्यंकटी लाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रथम जिल्हा परिषद शाळा घोडज येथे हरितक्रांतीचे जनक, कृषीसंत वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मुख्याध्यापक शिवाजीराव वाघमारे आणि शिक्षक वृंद, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते शाळेत वृक्षरोपण कार्यक्रम पार पडला.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषिदूत गोंधळे करन, घोगरे हनुमान,जांभुळकर मयूर, गायकवाड तिरुपती, भसमपुरे ऋषिकेश, दसपुते सूर्यकांत या कृषीधुतांनी वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालय नेहरूनगर चे प्राचार्य डी.जी मोरे, पी.सी बंडेवार सर, पी. एस हनवते सर, एस बी बसवंते सर, स्वप्नील कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेऊन यशस्वीपणे उपक्रम राबविण्यात आला.

