अहमदपूर ( प्रतिनिधी) पुरस्कार हा एखाद्या पांथस्थाला प्रवासात मिळणाऱ्या सावली सारखा असतो. असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी आणि देविदास फुलारी यांनी केले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंती निमित्त आणि राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा दे ता लोहा जि नांदेड आयोजित मराठवाडा स्तरीय भव्य कविसंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते माननीय आनंद ( बंटी भाऊ) लांडगे यांना राजर्षी शाहू मराठवाडा भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.स्वागताध्यक्ष म्हणून राजेश पावडे, निमंत्रक सुरेश हाटकर, विशेष उपस्थिती म्हणून समाजल्याण सहआयुक्त शिवानंद मिनगीरे आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश एम. जोशी यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना कविवर्य देविदास फुलारी म्हणाले की, पुरस्काराने जबाबदारी वाढते. या प्रवासात तो सावली सारखा आहे. पुरस्कार वितरणानंतर लगेच निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले. कविसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून कवी महेश मोरे, अॅड भीमराव हाटकर आणि जेष्ठ कवी एन डी राठोड यांची उपस्थिती होती. या कविसंमेलनात एकुण १७ जणांनी सहभाग घेतला.
यात गझलकार चंद्रकांत कदम, क्रांतीकुमार पंडित, प्रा. भगवान आमलापुरे, कवी तुकाराम खिल्लारे, प्रज्ञाधर ढवळे, रुपाली वागरे वैद्य, उषाताई ठाकूर, थोरात बंधू, मारोती मुंडे, एन. सी. भंडारे, प्रशांत गवळे, संतोष चमकुरे, राम तरटे, डॉ. भीमराव हाटकर, महेश मोरे, श्रीकांत मगर यांनी कविता सादर केल्या. यावेळी अमित थोरात यांची उपस्थिती होती. कविसंमेलनाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. तर आभार भैय्यासाहेब गोडबोले यांनी मानले.

