कंधार ;
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना माहामारीची परिस्थिती अतिश्य गंभीर होत चाललेलीआहे. त्यातच संपूर्ण महाराष्ट्रमध्ये कोविड सेंटरमध्ये महिला अत्याचाराच्या अनेक घटनाघडल्या आहेत. त्यामुळे महिला असूरक्षित आहे.त्यामुळे कंधार येथिल कोविड सेंटरमध्ये महीला रुग्णांच्या सूरक्षिततेसाठी महीला पोलीसांची नेमणूक करण्याची मागणी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.चित्ररेखा गोरे यांच्या नेतृत्वाखाली शाखा कंधारच्या वतीने तहसिलदार कंधार यांना दि.२२ रोजी केली आहे.
सदरील वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार करावा .कोव्हीड सेंटर मध्ये महिला दक्षता समिती नेमावी त्यामुळे महिला दक्षता समितीकडे मांडू शकतील,24 तासमहिला कोविड सेंटर मध्ये लेडिज कॉन्सटेबल व बेलची व्यवस्था करावी असे निवेदनात नमूद करण्यात आली आहे.याबाबत कार्यवाही न केल्यास भाजपा महिला मोर्चा नांदेड ग्रामीणच्यावतीने आंदोलनचा इशारा देण्यात आली आहे.
या निवेदनावर भाजपा महिला मोर्चा जिल्हा मोर्चा जिल्हाध्यक्ष चित्ररेखा गोरे ॲड.सौ.जयमंगला औरादकर ,माजी नगरसेविका मिनाताई मुखेडकर,प्रतिभा फरकंडे,कल्पना गित्ते,वंदना डुमणे,ज्योती फरकंडे,मिरा मामडे,गंगासागर यमलवाड,दैवशाला गोरे,ज्योती राठौड,शोभाताई कांबळे आदीसह महीलांचे स्वाक्षरी आहेत.