कंधार .मो.सिकंदर
दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या महान सुफी संत हजरत शेख सय्यद अली सांगडे सुलतान मुश्किले आसान रहेमतुला अल्लैह (छोटी दर्गा) कोरोना महामारी मुळे व शासनाच्या आदेशाने दिनांक २६ ते २८ या दोन दिवस चालणारा ऊर्स या वर्षी भरणार नाही तसेच दर्गा दर्शनासाठी बंद राहणार आहे
त्यामुळे सर्व भक्त भाविकांसाठी बंद असल्याने दर्गाचे ५८६ व्या उर्सचे आवश्यक धार्मिक कार्यक्रम वगळता ईतर सर्व सार्वजनीक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची घोषणा दर्गाचे १७ वेळ वंशज (नातु) सज्जादानशींन व मुतवल्ली सय्यद शाह अन्वारुल्लाह हुसैनी यांनी बोलताना केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्याच्याठिकाणी ५८६ वर्षांपूर्वीपासून असलेल्या प्रसिद्ध सुफी संत हजरत शेख सय्यद अली सांगडे सुलतान मुश्किले आसान रहेमतुल्ला अलैह (छोटी दर्गा) यांच्या वर असणाऱ्या अपार श्रद्धेमुळे येथे होणाऱ्या वार्षिक उर्ससाठी राज्यातील
अनेक जिल्ह्यातूनच नव्हे तर भारतातील अनेक राज्यातून प्रत्येक जाती धर्माचे, वंशाचे, विविध संस्कृतीचे लाखो भक्त भाविक नित्यनेमाने येत असतात व पवित्र अल्लाहकडे त्यांच्या वशिल्याने प्रार्थना करीत असतात.
परंतु या वर्षी संपूर्ण राज्यात, देशासह जगभरात कोरोना सारख्या महामारीच्या संसर्ग रोगाने थैमान घातले असून शासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्यामुळे दर्गा अनेक महिन्यापासून भाविकांसाठी बंद असून, यंदाच्या ५८६ व्या उर्स महोत्सवात येऊ इच्छिणाऱ्या विविध राज्यांतील हिंदू-मुस्लीम,
शिख व इतर सर्वधर्मीय भक्त भाविकांना सज्जादानशीन व मुतवल्ली सय्यद शाह अन्वारुल्लाह हुसैनी यांच्याकडून असे आवाहन करण्यात येते की दरवर्षी उर्स मध्ये होणारे सार्वजनिक कार्यक्रम या वर्षी कोरोना महामारीमुळे रद्द करण्याचे ठरविले आहे.
यात दरवर्षी निघणारे सार्वजनिक संदल, तसेच सुफी संत याच्या जीवनकार्याबाबत व त्यांनी दिलेल्या मानवतेचे संदेश सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी दरवर्षी होणारे प्रबोधनात्मक कार्यक्रम, सार्वजनिक कव्वालिचे व लंगरचे (प्रसाद वाटपाचे) विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मूळ छोटी दर्गासोबतच हजरत सय्यद शाह अजिमोद्दीन शाह धडक (रह.) आणि सय्यद शाह मोईनोद्दीन शाह कडक (रह.) या दर्गाचे कायदेशीर वंशज असलेले सज्जादानशीन मुतवल्ली सय्यद शाह अन्वारुल्लाह हुसैनी हे या सर्व दर्गावरती संदल चढवून इतर धार्मिक विधी नेहमीप्रमाणे स्वतः पार पाडणार आहेत.
म्हणून दर्गा परिसरात न येता, आपापल्या घरी सुखरुप राहुन या सुफी संतांच्या वशिल्याने अल्लाह कडे कोरोना महामारी सोबतच इतर रोगांपासून, आजारांपासून सर्व धर्माच्या भाऊ बांधवांची सुरक्षा करण्यासाठी, सर्वांच्या चांगल्या आरोग्यासाठी, समाजातून गरिबी दुर करण्यासाठी, द्वेष, राग, कपट, हिंसा अश्या कु-प्रवृत्तीपासून दूर राहण्यासाठी प्रार्थना करण्याचे कळकळीचे आवाहन सज्जादानशीन मुतवल्ली सय्यद शाह अन्वारुल्लाह हुसैनी यांनी केले आहे.