कंधार ;ता.प्र
लोहा कंधार मतदार संघातील शेतकरी तिहेरी संकटात सापडला आहे. कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.कोरोनाचे संकट असतानाच शेतकऱ्यांचे मुग ऊडिद हे पिके ही हातातुन गेली आहे.असे असतानाच गेल्या काही दिवसांपासून कंधार व लोहा तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाला आलेल्या सोयाबिन कापुस या सह विविध पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असल्याने कंधार व लोहा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांनी जिल्हाधिकारी यांना दिनांक २१ संप्टेबर रोजी दिले आहे.
कंधार व लोहा तालुक्यात गेल्या काही दिवसापासुन सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाला आलेल्या सोयाबिन कापुस या सह विविध पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असल्याने कंधार व लोहा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांनी जिल्हाधिकारी यांना दिले असुन या निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की,
गेल्या काही दिवसांपासून कंधार व लोहा तालुक्यात सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे सोयाबीन कापूस मूग उडीद इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून जिल्ह्यात वाऱ्यामुळे ऊस आडवा पडला आहे.अनेक जनावर पुरात वाहून गेले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यामुळे शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावे अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात चा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे