कंधार ;
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने कंधार व लोहा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय उभारणीसाठी सन 2012 मध्ये मंजुरी मिळाली पण लोहा येथील उपजिल्हा रुग्णालय त्वरित बांधकाम करून पन्नास खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सर्व सोयीनी सुरूही करण्यात आले पण आज घडीला कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असून कंधार तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय नसल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची ऑक्सीजन मात्रा कमी जास्त झाल्यास लोहा नांदेड येथे पाठविण्यात येत आहेत म्हणूनच कंधार उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी भाजपचे शहराध्यक्ष अॅड गंगाप्रसाद यन्नावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
कंधार येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीसाठी शासनाच्या वतीने सन 2012 मध्ये मंजुरी मिळाली असून स्थानिक प्रशासनाच्या वतीने कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अरविंद फिसके यांनी यांनी उपजिल्हा रुग्णालय साठी बांधकाम करण्यात येणारी जागा बाळतवाडी तालुका कंधार हस्तांतरित करण्यात आली आहे परंतु अजूनही बांधकामाची सुरुवात किंवा भूमिपूजन झाले नाहीत व प्रशासकीय कार्य पूर्ण झाले असले तरी आजतागायत हे काम पूर्ण झाले नाही तर covid-19 च्या महामारीत रुग्णालय उपयोगी पडले असते परंतु शासनाच्या दिरंगाईमुळे हे उपजिल्हा रुग्णालयाचे काम खोळंबले असल्याचे या निवेदनावर म्हटले आहे या निवेदनाच्या प्रति खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, उपविभागीय अधिकारी कंधार, सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड, तहसील कार्यालय कंधार, सार्वजनिक बांधकाम विभाग कंधार भाजपचे शहराध्यक्ष अॅड गंगाप्रसाद यन्नावार याच्या स्वाक्षरीने देण्यात आल्या आहेत.
**********************
अन्य घडामोडी..