रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक महान समाजसुधारक शिक्षण प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२सप्टेंबर १८८७मध्ये झाला.कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौंडा पाटील असे होते.ते जातीने जैन असले तरी समूर्णं बहुजन समाजाला ते आपलेसे वाटत.राज्यात शैक्षणिक क्रांती,पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करण्याचे कार्य करुन जून्या प्रथा परंपरा यावर त्यांनी प्रहार केला.महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा भाऊराव यांच्यावर प्रचंड प्रभाव होता.त्यामूळे बहुजनसमाजाच्या सर्वांगिण विकासाच्या ध्येयाने त्यांना झपाटले होते.शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.मागास आणि गरिब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून “कमवा आणि शिका”ही योजना सूरु केली.४आॅक्टोंबर१९१९मध्ये “रयत शिक्षण संस्थेची”स्थापना सातारा येथे केली.
रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था असुन महाराष्ट्रात ४जिल्ह्यात व कर्नाटक मध्ये मिळून यांच्या ६७५शाखा आहेत.
पुर्विच्या काळी बहुजनांना गुलामगिरीत जगव लागत.पाण्यासाठी तासनतास विनवणी करावी लागे हे पाहून अण्णाचे कोमल हृदय पिळवटून निघाले.रागात त्यांनी राहाठ मोडून आडात फेकला.त्यांच्यात अन्यायाविरुध्द बंडखोरी करण्याची वृत्ती सत्याप्पा यांच्याकडून मीळाली.आपल्या अखंड आयुष्यभर बहुजनांचा उध्दार करण्याचा वसा घेत शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला.त्यांना मोफत शिक्षणाची व्यस्था केली.ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर भाऊरावांनी क्रमिक शिक्षणच नव्हे तर समता,बंधुता,श्रमप्रतिष्ठा,सामाजिक बांधिलकी अदि मुल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.साता-यात भाऊरावांनी एक मोठे वस्तिगृह स्थापन केले,हे वस्तिगृह चालविण्यासाठी त्यांच्या पत्निचे स्वता:चे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले.या सामाजिक कार्यात पत्नि लक्ष्मीबाई यांची मोलाची साथ लाभली”कमवा आणि शिका”या पध्दतीने चालणारे पहिले “फ्री अॅन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल सातारा येथे सूरु केले.त्याला “महाराजा सयाजीराव हायस्कूल” हे नाव दिले.यानंतर शाळा स्थापन करण्याची मालिकाच त्यांनी सुरु केली.महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानून भाऊरावांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले.प्रत्येक गावात शाळा,बहुजन समाजातील” शिक्षक व शिक्षक प्रशिक्षण”या सूत्राचा त्यांनी पाठपूरावा केला.
महाराष्ट्रातील जनतेने भाऊराव यांच्यावर भरभरुन प्रेम केले.त्यांना कर्मवीर ही पदवी देउन गौरव केला.तसेच त्यांच्या कार्याची दखल घेत “पद्यभूषण”या पुरस्काराने सन्मानित केले.बहूजन समाजाला शिक्षणाचा आधार देणा-या या महामानवाला त्यांच्या जंयती निम्मित विनम्र अभिवादन
रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१