नांदेड प्रतिनिधी :
महाराष्ट्रात मराठा समाजाने वेगवेगळ्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी लढा दिला अनेक वेळा लाखोचे मूक मोर्चे काढून शासनाला कुठल्याही शासनाच्या संपत्तीचे कुठलेही नुकसान न करता शांत व शिस्तीत लाखोचे मूक मोर्चे काढून मराठा समाजाच्या भावना त्यांनी आतापर्यंत शासन दरबारी कळवले आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक मराठा तरुण बांधवांनी बलिदान दिले आहे पण आरक्षण न मिळाल्यामुळे व आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे आता मराठा समाज मूक मोर्चे किंवा धरणे आंदोलन काढून स्वस्त बसणार नाही .
त्यासाठी लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी गायकवाड समितीने दिलेले पाठ पुरावे तात्काळ सादर करून मराठा समाजाचा सरळ सरळ ओबीसी संवर्गात समाविष्ट करण्यात यावा सध्या असलेल्या महा विकास आघाडी सरकारने न्यायमूर्ती एम.जी गायकवाड यांनी मराठा समाज आरक्षणास पात्र आहे व मराठा समाजातील नवतरुण शैक्षणिक क्षेत्रात व आर्थिक मागासलेला असल्याचे
न्यायमूर्ती एम.जी गायकवाड यांनी सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या भावना त्यांनी प्रत्यक्षात जाणून घेऊन मराठा समाज आरक्षणास पात्र आहे असे सांगितले होते तसा अहवालही त्यांनी राज्य शासनाला व कोर्टात सादर केले होते तसेच मराठा समाज राज्यघटना कलम 340 मधील आरक्षणास पात्र ठरला आहे.आतापर्यंत मराठा समाजाने लोकशाही मार्गाने व आपल्या सहानुभूती प्रमाणे मागण्या करीत होते
यानंतर मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असून आरक्षणासाठी काहीही करण्यास तयार आहे आता मूक मोर्चा नसून यानंतर ठोक मोर्चे काढून प्रत्येक खासदार आमदार आणि मंत्र्यांना धडा शिकवणार आहे त्यासाठी आपण वेळीच मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावा
जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठा समाजाचा ठोक मोर्चा चालूच राहणार मराठा समाजावर वेळोवेळी अन्याय होत असल्यामुळे मराठा समाज बांधव शासनाविरोधात नाराजीचे सूर निघत आहेत त्यामुळे न्यायमूर्ती एम.जी गायकवाड आयोगाने सरळ व स्पष्ट पणे मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र असल्याचा अहवाल सादर केला आहे
त्यामुळे मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी मराठा महासंग्राम संघटनेचे नांदेड व हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे
दिलेल्या निवेदनावर जिल्हाप्रमुख प्रदीप पाटील हुंबाड जिल्हा कार्याध्यक्ष ओमराजे पाटील शिंदे जिल्हा सचिव संदीप पाटील पवार तालुकाध्यक्ष नायगाव भाऊसाहेब पाटील चव्हाण बिलोली तालुका अध्यक्ष श्रीनिवास पाटील मुरके कंधार तालुका अध्यक्ष संभाजी पाटील पवळे यांच्या स्वाक्षर्या आहेत.
***********