कंधार ;
गेल्या पाच वर्षापासुन भारतीय सैनिकांना रक्षाबंधन उपक्रमात कंधार येथून ३३३३ राख्या व शुभेच्छा संदेश पाठवून सैनिकांना आम्ही तुमच्या राष्ट्रहिताच्या व देशरंक्षणाच्या कार्यात सोबत आहेत ही आदराची भावनासाठी कंधार येथिल सुंदर अक्षर कार्यशाळेच्या वतीने देशातील पंधरा ते विस बटालीयनला राख्या पाठवल्या जातात .यावर्षीही कोरोना संकटात या उपक्रमाला खंड न पडू देता १५ फुटाच्या महाराखीसह शुभेच्छा संदेश दि.२२ जुलै रोजी भारतीय पोस्टाद्वारे कंधार येथून पाठवण्यात आले.
येथिल दत्तात्रय एमेकर यांच्या सुंदर अक्षर कार्यशाळा उपकक्रमातून भारतीय सिमेवरील सैनिकांना रक्षाबंधन उपक्रम नावलौकीकास आला आहे.आतापर्यत एमेकर यांनी १२ भाषेतून चरित्र कथन ,खंदारी वात्रटिका,कविता.लेख,आत्मकथन,सुत्रसंचालन,सुंदर अक्षर कार्यशाळा,स्मशानभुमी दिवाळी साजरी अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून मित्र परिवाच्या सहकार्याने यशस्वी राबविले असल्याची माहीती आयोजकांनी दिली .
दि.२२ जुलै रोजी 15 फुटाची महाराखी सोबत कांही चिमुकल्या शालेय भगीनींच्या सदिच्छा पत्रे व ५० राख्या भारतीय सीमेकडे कंधार येथिल पोस्टातून रवाना करण्यात आल्या आहेत.या कार्यक्रमाला पोलीस सुनील पत्रे,मुख्याध्यापक राजहंस शहापुरे ,योगगुरु नीळकंठ मोरे , दिगंबर वाघमारे , पत्रकार नितिन मोरे ,दृष्टांत एमेकर कु.संतोषी गीते,कु.शिवानी गीते,कु.प्रज्ञा गीते उपस्थित होते.