कंधार ;
तालुक्यातील श्री संत नामदेव महाराज मठ संस्थान श्री क्षेञ उमरज च्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी दिनांक ५ आॕगस्ट ते १२ आॕगस्ट दरम्यान श्री कृष्ण जन्मोत्सव व संस्थानचे संस्थापक श्री गुरु नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्त अखंड हरी नाम सप्ताह सह होणारे विविध कार्यक्रम कोरोना विषाणु चे संकट लक्षात घेता या वार्षी रद्द करण्यात आल्याची माहीती संस्थानचे मठाधीपती एकनाथ गुरू नामदेव महाराज यांनी दिली.
संपुर्ण जगासह देशात संसर्गजन्य कोरोना विषाणुने थैमान घातलेले आसुन याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपायोजना राबविल्या जात आहेत या सर्व समस्यांचा विचार करुन श्री संत नामदेव महाराज मठ संस्थान उमरज येथे दरवर्षी श्री कृष्ण जन्मोत्सव व मठाचे संस्थापक मठाधीपती श्री संत नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्त अखंड हरीनाम सप्ताह सह विविध कार्यक्रमासह मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सोहळा या वर्षी दिनांक ५आॕगस्ट रोजी पासुन अखंड हरीनाम सप्ताह प्रारंभ होऊन दिनांक १२आॕगस्ट रोजी सांगता होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आसुन सर्व भाविक भक्तांनी श्री क्षेञ उमरज कडे न येता आप आपल्या स्वतःच्या घरातच थांबून स्वतः ची व आपल्या कुटुंबांची काळजी घ्यावी असे आवाहन संस्थानचे मठाधीपती एकनाथ गुरु नामदेव महाराज यांनी सर्व भक्तांना केलेले आहे.