कंधार ;
तालुक्यातील मौ. दाताळा येथील शेतकरी शासनाच्या महात्मा फुले शेतकरी पिक कर्ज माफीत येथिल ५३ पात्र होते
तशी शेतकऱ्याची यादी ग्राम पंचायत दाताळा येथे लावली होती. नंतर शेतकऱ्यांनी चौकशी केला
असता महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा-उस्माननगर चे बँक मॅनेजर यांनी सदरील शेतकऱ्यांना उडवा
उडवीचे उत्तर देत चक्क यादीतून नावच गायब केले असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा-उस्माननगर चे बँक मॅनेजर यांनी मौ. दाताळा येथील ५३ शेतकऱ्यांचे नावे ऑनलाईन कर्ज माफीत टाकलेले नसल्याने
सदरील बँकेच्या मॅनेजरच्या
चुकीमुळे ५३ शेतकऱ्यांचे कर्ज माफी पासुन वंचित राहत आहेत.
सदरील शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळवुन दयावी अन्यथा अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना सोबत घेवुन वंचित बहुजन आघाडी आमरण उपोषन व आंदोलन पुकारणार आहे. होणाऱ्या गंभिर परिनामास शासन व सदरील बँक
मॅनेजर राहतील असे दि.२४ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांना वंचित बहुजन आघाडी शाखा कंधारच्या वतिने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे.या निवेदनावर वंचित बहूजन आघाडी जिल्हा अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य शिवाभाऊ नरंगले,प्रभाकर भुरे,शेषराव शिंदे,चंद्रकांत सुर्यवंशी,अचुत शिंदे,गोविंद शिंदे,देविदास हाके,भाऊसाहेब शिंदे,शंकर टाके,बळिराम शिंदे आदीसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.