नांदेड ;
श्री.गुरू गोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते संजय नरवाडे यांना इंजि.प्रशांत इंगोले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांमध्ये बहुजनांचा वाली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यांनी कोरोना काळात, लॉकडाउनमध्ये गरजू नागरिकांना मदत व सेवा दिली . या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना सदरील पुरस्कार देण्यात आलेला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडी उत्तर जिल्हाध्यक्ष इंजि.प्रशांत इंगोले, डॉ.संघरत्न कुऱ्हे, युगांतर वृत्तपत्राचे संपादक श्याम कांबळे ,प्रेमसागर पाईकराव, प्रशांत आस्माने ,रोहन काहाळेकर ,संदीप वने यांसह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.