अनाधिकृत नळधारकांना नियमानुसार नियमित करा महापौर सौ. मोहिनी येवनकर


नांदेड दि. 24 –

शहरातील अनाधिकृत नळाबाबत शोध मोहिम राबवून अनाधिकृत नळधारकांना नियमित करावे व शहरवासीयांना दररोज शुद्ध पाणी पुरवठा करावा असे निर्देश महापौर सौ. मोहिनी विजय येवनकर यांनी दिले आहेत.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची बैठक गुरुवार दि. 24 सप्टेंबर रोजी महापौर सौ. मोहिनी विजय येवनकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर म. मसुद अहेमदखान उस्मानखान, महिला बालकल्याण सभापती सौ. सरिता बिरकले, उपसभापती ज्योत्सना गोडबोले, विजय येवनकर, गफारखान, शेरअली, नागनाथ गड्डम, संदीप सोनकांबळे, उपायुक्त शुभंम क्यातमवार, कार्यकारी अभियंता अंधारे सह पाणी पुरवठा विभागातील अभियंत्यांची उपस्थिती होती.
यावेळी महापौर सौ. मोहिनी येवनकर यांनी शहरातील पाणी पुरवठा व पाणीपुरवठा संबंधित समस्यांचा आढावा घेतला.  शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमणात अनाधिकृत नळ जोडणी असल्याने पाण्याचा अपव्यय तसेच अनेक भागात पाणी साचते तसेच शहराच्या काही भागात पाणी पुरवठा लाईन लीकेज आहे. यामुळे काही भागात शहरवासीयांना अशुद्ध पाणीपुरवठा होतो. यासाठी पाणी पुरवठा विभागाने शहराच्या विविध भागात शोध मोहिम राबवून कमी दरात शहरवासीयांना अधिकृ नळ जोडणी करुन द्यावी. तसेच पाणी पुरवठा लाईन लिकेजचीही दुरुस्ती करावी ज्यामुळे शहरवासीयांना नियमीत शुद्ध पाणी पुरवठा होईल यासाठी आवश्यक त्या उपयायोजना कराव्यात असे निर्देश महापौर सौ. मोहिनी येवनकर यांनी दिले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *