कंधार ; दिगांबर वाघमारे
नांदेड जिल्ह्यातील जुनी व प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या कंधार शहरात दररोज हजारो नागरिकांची रेलचेल असते. मात्र आरोग्य सुविधा अपुरी असल्याने नेहमी आरोग्य समस्या जाणवत असतेत्यामुळे येथे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णाललय निर्माण व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती.
आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी या मागणीचा शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी प्राप्त करून घेतली होती. 30कोटी 88 लाख 55 हजार रुपये एवढ्या रकमेच्या अंदाजपत्रक व नकाशांना प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कंधार येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी 30 कोटी 88 लाख 53 हजार एवढ्या रकमेच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली आहे.
त्यामुळे लवकरच 50 खाटांचे हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेत येणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
उपजिल्हा रुग्णालयासाठी लागणाऱ्या 30 कोटी 88लाख 53 हजार रुपयांच्या आर्थिक प्रस्तावास मान्यता दिल्याचे आरोग्य सेवा संचालनालयाचे 16सप्टेंबर रोजी निर्गमीत करण्यात आलेले पत्र नुकतेच प्राप्त झाले असून लवकरच कंधार येथे या उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू होणार आहे. सदर उपजिल्हा रुग्णालय कंधार येथे खेचून आणल्यात आमदार शिंदे यांनी शासन दरबारी पुर्ण ताकद लावली होती. त्यामुळेच 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कंधार येथे साकार होत आहे. कंधार विधानसभा क्षेत्र अतिदुर्गम व मागास असून या क्षेत्रात एकही 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय नव्हते या उपजिल्हा रुग्णालयाच्या निर्मितीमुळे संबंधित लोहा, मुखेड, नायगाव तालुक्यातील रुग्णांनाही या उपजिल्हा रुग्णालयाचा लाभ मिळणार आहे. तसेच सीमेलगतच्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, जळकोट तालुक्यातील अनेक गावातील अनेक रुग्ण थेट नांदेड, लातूर उपचारासाठी जात असतात. त्यांंनाही आता कंधार येथे उपचार घेण्याची संधी या रुग्णालयामुळे मिळणार आहे.कंधार येथे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय निर्माण व्हावे, अशी या परिसरातील नगारिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती. त्यामुळे आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्य सुदृढ राहावे, त्यांना योग्य वेळी योग्य उपचार मिळावा, छोट्या छोट्या व्याधीसाठी नांदेड जावे लागु नये, या बाबीचा विचार करुन आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी हा ज्वलंत प्रश्न शासनाकडे लावून धरला होता व अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
********** पत्रकार परीषद ******
याबाबत दि.२३ सप्टेंबर रोजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे बंधू तथा माजी जि.प.सदस्य रावसाहेब शिंदे यांनी कंधार येथिल संपर्क कार्यालयात पत्रकार परीषद घेवून या बाबत दुजोरा दिला आहे.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती ज्ञानेश्वर चोंडे , रोहित शिंदे , अरुण पाटील कदम ,बंटी गादेकर ,कपिल वागदरे, शेरू शेरु भाई ,नितीन पाटील, सचिन जाधव आदी उपस्थित होते.-
——————————————–
*या असणार सुविधा*
या रुग्णालयात सोनोग्राफी, एक्सरे, अद्यावत प्रयोगशाळा असणार आहे. उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियन व तज्ञ डॉक्टर असणार आहेत. रुग्णालयात शस्त्रक्रिया सुद्धाहोणार आहेत