मंत्रालयात आमदार श्यामसुंदर शिंदे यांची जलसंपदा मंत्री जयंत पाटीलांशी दे टाळी…!


 लोहा कंधार मतदारसंघातील सिंचन, पाणीपुरवठा यासह विविध विषयावर चर्चा 


मुंबई; दिगांबर वाघमारे 


 लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे *जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील साहेब व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण,पाणीपुरवठा व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे  यांची दि.२४ सप्टेंबर रोजी सदिच्छा भेट घेऊन लोहा कंधार मतदारसंघातील *सिंचन, पाणीपुरवठा,पर्यावरण व वेगवेगळ्या विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात सविस्तर चर्चा करत विकास कामांना दे टाळी केली आहे.*

यावेळी करण्यात आली त्याप्रसंगी जि. प. सदस्य चंद्रसेन पाटील उपस्थित होते .नुकताच कंधार येथे पत्रकार परीषद घेवून शहरात ५० खाटाचे उपजिल्हा रुग्णालय प्रश्न आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नामुळे साकार होणार असून निधी प्राप्त झाले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या कामाची हातोटी ,आभ्यास व प्रशासनातील अनुभव यामुळे मतदार संघात अनेक विकास कामे मार्गी लागणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ज्ञानेश्वर चोंडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *