मुखेड: (दादाराव आगलावे)
श्री संत नामदेव महाराज विद्यालय दापका (राजा) येथे स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव व लोकशाही मूल्यांची रुजवणूक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम मुख्याध्यापक शिवाजी डावकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत कु. ऋतुजा सुधाकर केंद्रे यांनी मुख्याध्यापिकेची, तर कु. स्वाती धोंडीराम वाडकर यांनी उपमुख्याध्यापिकेची भूमिका समर्थपणे पार पाडली. सहशिक्षिका म्हणून कु. सीमा अंकुश बट्टेवाड, कु. सुप्रिया सिद्धेश्वर स्वामी, कु. ममता शांतीराम बोईनवाड, कु. अंजली दयानंद वगलवाड, कु. आरती बालाजी गायकवाड, कु. राजेश्री सुनील चिखले, कु. नंदिनी तुळशीराम जोगदंड, कु. प्रांजली तानाजी भूत्तापल्ले, कु. कावेरी विष्णुकांत पवार, कु. दिव्या निळकंठ जाधव,
लक्ष्मण जनार्धन तेलंग, महेश लक्ष्मण पंजलवाड, आदित्य दिलीप घोडके, सागर नेताजी बिरादार, संगमेश्वर शिवकांत मोरडे, गोविंद रामदास गायकवाड, शेख गौस जिलानी
आदींनी सहशिक्षकाची भुमीका यशस्वी पार पाडली.
स्वयंशासन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध जबाबदाऱ्या स्वीकारून शाळेचे दैनंदिन कामकाज सुरळीतपणे पार पाडत लिपिकीय कामकाज ओमकार रामदास तेलंग व शिवदर्शन प्रदीप पाखंडे यांनी, तर सेवक म्हणून शिवाजी आनंद यमुलवाड, सुमित प्रकाश गायकवाड, अजित उत्तम कांबळे यांनी आपापल्या भूमिका चोखपणे बजावल्या. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वकौशल्य व संघभावना वृद्धिंगत झाल्याचे दिसून आले. शाळा प्रशासन व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक करून भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. स्वयंशासन दिनाच्या यशस्वी आयोजनामुळे शाळेच्या शैक्षणिक परंपरेला नवी ऊर्जा मिळाली. यावेळी स्वयंशासन दिनातील मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदरील विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.


