नांदेड येथे 24 व 25 जानेवारी रोजी ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम होत आहे. जागतिक स्तरावरील या कार्यक्रमात नांदेडकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा. देशासह परदेशातून येणाऱ्या भाविक भक्तांच्या स्वागतासाठी ही नांदेडकरांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या तयारीचा मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) सविस्तर आढावा घेतला. मोदी मैदानावरील कार्यक्रम ठिकाणच्या परिसरात ५२ एकर मैदानावर भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत . प्रशासनाने यासाठी सूक्ष्म नियोजन केले असून तयारी अंतिम टप्प्यात आहे. भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, मैदानालगत दोन टेन्ट सिटी, त्यामध्ये सुमारे १४ हजार भाविकांची निवास क्षमता, हॉटेल्स, शहरातील मंगल कार्यालये व शाळांमध्येही निवास व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आले आहे. त्यामुळे हा सोहळा ऐतिहासिक आणि संस्मरणीय ठरणार आहे. गुरुगोविंद सिंगजी यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या नांदेड येथे पार पडणारा हिंद दी चादर कार्यक्रम अधिक यशस्वी करण्यासाठी नांदेडकरांनी स्वतः पुढाकार घ्यावा. प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करावे . माजी मुख्यमंत्री खासदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब उपस्थित होते.

