विक्रांतदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ऑनलाईन नोकरी महोत्सवाला विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ


कंधार ; दिगांबर वाघमारे 

विक्रांतदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येत आसलेल्या  ऑनलाईन नोकरी महोत्सवसाठी  विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आले असल्याचे 25 सप्टेंबर शुक्रवार रोजी  जाहीर करण्यात आले.
  लोहा कंधार युवानेते #विक्रांतदादा_श्यामसुंदर_शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणाऱ्या नोकरी महोत्सवाच्या  मुलाखती लोहा येथे आमदार श्यामसुंदर शिंदे  यांच्या संपर्क कार्यालयात मोठ्या उत्सवात चालू आहेत. यामध्ये असंख्य युवकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसात नोंदवला आहे. 

सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करत विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाखती ह्या मर्यादित युवक व युवतींना बोलावून चालू आहेत.तसेच असंख्य मुलाखत देणाऱ्या उमेदवारांना नोकरी सुद्धा मिळाली आहे.

*नोकरी मिळालेल्या उमेदवारांना औरंगाबाद,पुणे,मुंबई,अहमदनगर याठिकाणी नामांकित कंपनीमध्ये उमेदवारांच्या सोयीनुसार नियुक्त होण्याचे कळविले आहे,बरेच उमेदवार आपापल्या नियुक्त केलेल्या कंपनीमध्ये नियुक्त पण झाले आहेत .

तरी इच्छुक उमेदवारांनी *बोला अँप* वरती आपली शैक्षणिक माहिती भरून आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांच्या लोहा येथील संपर्क कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन #विक्रांतदादा_श्यामसुंदर_शिंदे मित्रमंडळाच्या वतिने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *