कंधार ; दिगांबर वाघमारे
कोविड 19 या जागतिक महामारीच्या काळामध्ये कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व उपचाराच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्यासाठी गावपातळीवर आशा स्वयंसेविका ह्या ग्राउंडलेवल ला मागच्या सहा महीन्या पासून अतिशय उत्कृष्टपणे काम करत आहेत. त्याच्या या कामाचे कौतुक व गौरव करण्याच्या उद्देशाने कंधार तालुक्यात प्रथमच प्राथमिक आरोग्य केंद्र पानशेवडी ता. कंधार च्या वतीने प्रा.आ.केंद्रांतर्गत कार्यरत असलेल्या 35 आशा स्वयंसेविका व 01 आशा गटप्रवर्तक यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
दि.२५ सप्टेंबर रोजी कंधार तालुका आरोग्य आधिकारी डाॕ. एस.पी.ढवळे व पचायत समिती आरोग्य विस्तार अधिकारी श्रीमती चिंतेवार मॕडम ,प्रा.आ.कें. पानशेवडीच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.फरनाजजहाॕ शेख यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
यावेळी मा. तालुका आरोग्य अधिकारी डाॕ. एस.पी.ढवळे यांनी उपस्थित सर्व आशांचे कौतुक करत त्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित आशांपैकी कांही आशांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांचा सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी वैद्यकीय अधिकारी डाॕ.फरनाजजहाॕंं शेख यांनी प्रां.आ.केंद्रांतर्गत कार्यंक्षेत्रातील आशा यांनी कोरोना या आजारा बद्दल मनात भीती न बाळगता, वैयक्तिक अडचणी बाजूला सारत, आळस न करता अतिशय उत्कृष्टपणे काम केल्या बध्दल सर्व आशांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.