आमदार श्यामसुंदर शिंदे यांना कोरोनाची लागण ; कोरोनाला हरवून लवकर सेवेत येतील…कार्यक्रत्यांचा विश्वास

कंधार ;(कार्यक्रत्यांच्या लेखणीतून)

लोहा ,कंधार मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांच्या सुविद्य पत्नी सामाजिक कार्यकर्त्या ममता सागर सौभाग्यवती आशाताई शामसुंदर शिंदे ह्या कोरोना पॉझिटिव आल्याचे कळताच मन सुन्न झाले ,काही वेळ डोक्यातील मेंदू काम करेना सा झाला पण या महा भयानक संकटातून माझ्या प्रेरणास्थान, मार्गदर्शिका, सौभाग्यवती आशाताई शामसुंदर शिंदे या नक्कीच कोरोना वर विजय मिळवून लवकरच कंधार ,लोहा तालुक्यातील लाखो गोरगरीब कष्टकरी ,शेतकरी ,भटक्या, वंचितांच्या आशीर्वादाने लवकरच लोहा, कंधार तालुक्यातील व नांदेड जिल्ह्यातील जनसामान्यांच्या सेवेसाठी येतील हा माझा दृढ विश्वास आहे .

ममता सागर सो. आशाताई शिंदे या कोरोना पॉझिटिव आल्यानंतरही त्यांनी प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी मिळवली नाही, त्यांनी छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगितले नाही, त्यांचे कारण की त्याना कार्यकर्त्यांना काळजीत टाकायचे नव्हते, पण ताई साहेब आपण उभ्या आयुष्यात मुंगीलाही कधी दुखापत केली नाही तर तुमचे ईश्वर वाईट करूच शकणार नाही, कारण लोहा, कंधार तालुक्यातील व नांदेड जिल्ह्यातील हजारो गोरगरीब कुटुंबा ला तुम्ही भाकरीची, अन्न-वस्त्र-निवाऱ्यची व्यवस्था केलेली आहे हे विसरून चालणार नाही. ताई साहेब तुम्ही लोहा, कंधार तालुक्यातील व नांदेड जिल्ह्यातील लोकांची सेवा त्यांचे ज्वलंत प्रश्न सोडवले आहेत. शेतकरी ,कष्टकरी ,कामगार सुशिक्षित बेरोजगार ,भटके, वंचित , यांना दोन वेळेच्या भाकरीचे आपण कायम व्यवस्था केलेली असून ईश्वर आपली परीक्षा घेत असून आपण या दिव्य अग्नी परीक्षेतून लवकरच सुखरूप होऊन लोहा ,कंधार च्या सर्वांगिन विकासासाठी तत्परतेने येणार आहात हा माझा विश्वास आहे .आज शुक्रवारी सायंकाळी नऊ वाजताच्या दरम्यान मला दुसरा दुःखद धक्का बसला तो लोहा ,कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार गोरगरीब शेतकऱ्यांचे कैवारी जनसामान्यांचे आधारवड माझे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, माझे दैवत आदरणीय आमदार शामसुंदर शिंदे साहेबांची टेस्ट पॉझिटिव्ह निघाल्याचे मला ममता सागर सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी दूरध्वनीवरून सांगतात मी सुन्न झालो मी कसाबसा ताई साहेब तुम्हाला व आदरणीय आमदार साहेबांना काही होणार नाही आपण दोघेही लवकरच लोहा ,कंधार मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कोरोनाला हरवून लवकरच परत येणार, आपण खचून जाऊ नका,लोहा, कंधार तालुक्यातील लाखो जनतेचे आशीर्वाद शिंदे कुटुंबियांवर आहेत, आपन आयुष्यात कधीच कोणाचे वाईट केलेले नाही ,फक्त आणि फक्त चांगलेच केलेले आहे.ईश्वर साक्षीला आहे आपल्या दैनंदिन कार्यात आपण गोरगरीब शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न तळमळीने सोडवलेली आहेत. मला ते दिवस आठवतात आदरणीय आमदार साहेब, आदरणीय ममता सागर ताई साहेब मला ते दिवस आठवतात आपण सर्व कुटुंब आदरणीय आमदार शिंदे साहेब ममता सागर सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे ,युवराज ,युवा नेते विक्रांत दादा शिंदे संपूर्ण शिंदे कुटुंब आपल्या जीवाची पर्वा न करता भटक्यांच्या पालावर, तांड्यावर ,वस्ती ,नगरा मध्ये जाऊन गोरगरीब जनतेसाठी अन्नधान्य वाटपाचे काम करत होतात तेव्हाच लोहा, कंधार तालुक्यातील लाखो जनतेनी आपणास भरभरून आशीर्वाद दिले आहेत ,एक लोकप्रतिनिधी, आमदार, मतदार संघातील गोरगरीब ,उपेक्षित, वंचितांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण आमदार म्हणून सर्व शिंदे कुटुंब कोरोनाच्या संकटात टाकले होते, हे लोहा, कंधार तालुक्यातील जनता विसरली नसून लोहा, कंधार तालुक्यातील गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांचे लाखो लोकांचे आशीर्वाद आमदार शिंदे साहेबांच्या कुटुंबियांवर असल्याने आजच्या कोरोना पॉझिटिव्ह च्या संकटातही नियती सुद्धा आपली हार मानेल ! हा माझा दृढ विश्वास आहे ! आदरणीय आमदार शिंदे साहेब ,आदरणीय ममता सागर आशाताई शिंदे या दाम्पत्याने उभ्या आयुष्यात फक्त आणि फक्त गोरगरिबांची सेवा केलेली असल्याची वेगळ्या प्रकारे सांगण्याची मला गरज वाटत नाही.

हिमालया एवढे कर्तत्व तुमचे कोरोनाची काय हिम्मत !

आदरणीय आमदार साहेब साहेब ,लोहा, कंधार तालुक्यातील गोरगरीब ,उपेक्षित, वंचित समाजाला आपली नितांत गरज असून लोहा, कंधार तालुक्यातिल व नांदेड जिल्ह्यातील लाखो सर्वसामान्य जनतेला तुमचे कार्य, तुमचा आशीर्वाद, तुमचे मार्गदर्शन, हवे असल्याने आपण लोहा ,कंधार तालुक्यातील व नांदेड जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार सुशिक्षित बेरोजगार यांचा कायम आशीर्वाद आपल्या शिंदे कुटुंबियांवर असल्याने लोहा ,कंधार मतदार संघाचे कर्तव्यदक्ष, आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब व सामाजिक कार्यकत्या ममता सागर सौ .आशाताई शिंदे या कोरोना ला हरवून लवकरच बरे होतील व लोहा ,कंधार मतदार संघाचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच येतील हीच आई तुळजाभवानी व साईबाबांच्या चरणी प्रार्थना!

आदरणीय आमदार शिंदे साहेब व आदरणीय ममतासागर सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे आपण लोहा, कंधार मतदार संघातील लाखो जनतेच्या आशीर्वादाने लवकरच बरे व्हाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *