कंधार ; दिगांबर वाघमारे
शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भावाप्रमाणे मोबदला मिळत
नव्हता. कवडीमोल दराने धान्य विकावे लागत होते.अनेक वर्षा
पासून प्रलंबित असलेल्या हमी भावाच्या मागणीची दखलघेत आ. श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे यांच्या प्रयत्नाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेड शेतमाल खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ज्ञानेश्वर चोंडे पाटील यांनी दिली आहे.
कंधारमध्ये आ.शामसुंदर शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, वेळोवेळी कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाविषयी आ. शामसुंदर शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या
सौ. आशाताई शिंदे हे प्राधान्याने कापूस खरेदीविषयी पाठपुरावा करून हा विषय निकाली काढला.
कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावाने खरेदी
करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून विशेष
बाब म्हणून बाजार समितीमध्ये नाफेड शेतीमाल खरेदी
केंद्र सुरू केले आहे.कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी २८ सप्टेंबरपासून कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार येथे सातबारा, बँक
पासबुक, आधारकार्ड, मोबाईल नंबर आणून नाव नोंदणी करावी.
नाफेडचे हमीभाव उडीद ६ हजार,
तूर ६ हजार,
मूग ७१९६
व सोयाबीन ३८८० रुपये असे आहेत.
या हमी भावाप्रमाणे शेतकऱ्यांना लाभ मिळणार
आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ
घ्यावा, असे आवाहन सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे
यांनी केले. यावेळी माजी जि.प.सदस्य रावसाहेब पाटील
शिंदे, उपसभापती अरुण पाटील कदम, नवरंगपुरा तंटा
मुक्ती समितीचे अध्यक्ष शेख शेरू, रोहित पा. शिंदे,
नितीन पाटील, बंटी गादेकर, अशोक सोनकांबळे,
अवधूत पेठकर, पानशेवडीचे सरपंच रमेश मोरे, सचिन
धानोरकर उपस्थित होते.