नांदेड,दि.26-;दिगांबर वाघमारे
पंजाब भवन कोविड सेंटरमधील 81 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु असून नवनिर्वाचित महापौर सौ.मोहिनीताई विजय येवनकर यांनी पीपीई कीट घालून थेट कोविड सेंटरमध्ये जावून बाधित रुग्णांना मिळणार्या सोयी सुविधाबाबत रुग्णांशी संवाद साधला.महापालिकेच्यावतीने पंजाब भवन येथे कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. नांदेड जिल्हयासह यवतमाळ, हिंगोली, परभणी येथील कोरोना बाधित रुग्ण येथे उपचार घेत आहेत. महापौर मोहिनी येवनकर यांनी
महापौरपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर तिसर्या दिवशी त्यांनी पंजाब कोविड सेंटरला भेट देवून तेथील रुग्णांना मिळणार्या उपचार, भोजन,नाष्टा,चहा व इतर सुविधा बाबत रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. सर्व सुविधा मिळत आहेत अशी माहिती महापौरांना यावेळी रुग्णांनी दिली आहे. यावेळी माजी नगरसेवक विजय येवनकर, नगरसेवक संदीप सोनकांबळे, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.बद्रोद्दीन, डॉ.जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती.